Yes Bank Personal Loan Intetest Rate : आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज भासते. अशावेळी आपण बँकेत जातो. अचानक पैशांची गरज उद्भवल्यास बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा सर्वोत्कृष्ट पर्याय असतो.

तथापि अनेक तज्ञ वैयक्तिक कर्जाची फारच आवश्यकता असल्यास तेव्हाच घेतले पाहिजे नाहीतर वैयक्तिक कर्ज घेणे टाळले पाहिजे असा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे वैयक्तिक कर्जासाठी खूपच अधिकचे व्याज मोजावे लागते.

इतर अन्य कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारले जाते. यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तथापि जर तुम्हाला अचानक पैशांची गरज उद्भवली आणि तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचे ठरवले तर अशावेळी येस बँक तुमच्या मदतीला धावणार आहे.

येस बँक इन्स्टंट म्हणजेच तात्काळ 50 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर करते. दरम्यान आता आपण येस बँकेच्या वैयक्तिक कर्जाची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Yes बँक देते 50 लाखाचे वैयक्तिक कर्ज

येस बँक नोकरदार किंवा स्वयंरोजगार लोकांना वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. ते घेणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. बँक चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्ज देण्यास प्राधान्य देते.

येस बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.99% पासून सुरू होतो. कर्ज परतफेड कालावधी हा 72 महिन्यांपर्यंत आहे. म्हणजेच तुम्ही कर्जाची परतफेड 6 वर्षांत करू शकता.

येस बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग फी देखील वसूल केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी याची देखील काळजी घ्यायची आहे. येस बँक प्रोसेसिंग फी म्हणून कर्जाची अडीच टक्के एवढी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *