Worlds Deepest Metro Station : सध्या जगात वाहतुकीची वेगवेगळी साधने आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार या साधनांचा वापर करत असतो. जरी असे असले तरीही अनेकजण मेट्रो ट्रेनला प्राधान्य देत असतात. कारण मेट्रो ट्रेनचा प्रवास हा इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा कमी खर्चिक असतो.
तसेच तो खूप आरामदायी असतो. परंतु तुम्हाला जगातील सर्वात जास्त खोल मेट्रो स्टेशन माहिती आहे का? अनेकांना खोल मेट्रो स्टेशनची कहाणी माहिती आहे? तर अनेकांना याची कसलीच कल्पना नाही. जर तुम्हालाही याबाबत माहिती नसेल तर बातमी सविस्तर वाचा.
जगातील सगळ्यात खोल मेट्रो स्टेशन
होंगयानकुन स्टेशन हे जगातील सगळ्यात खोल मेट्रो स्टेशन आहे, जे चीनमध्ये आहे. या स्थानकाची खोली 106 मीटरपर्यंत असल्याने याला जगातील सगळ्यात खोल मेट्रो स्टेशन म्हणतात.
कधी सुरू झालीय सेवा
हे मेट्रो स्टेशन चोंगकिंग कॉर्पोरेशन क्षेत्राच्या चोंगकिंग रेल ट्रान्झिटमधील लाईन क्रमांक 9 वर बांधण्यात आले आहे, जे 2022 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुले केले गेले आहे.
खोल बिंदू 116 मीटर
इतकेच नाही तर या मेट्रो स्टेशनवर एक पॉइंट आहे, ज्याची खोली 116 मीटर इतकी आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकपासून जमिनीपर्यंतचे अंतर 106 मीटर इतके मोजण्यात आले आहे, या स्टेशनने चीनमध्ये असणाऱ्या लाईन-10 वरील होंगतुडी मेट्रो स्टेशनचा विक्रम मोडला आहे.
जाणून घ्या जगातील दुसरे खोल मेट्रो स्टेशन
दरम्यान आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की जगातील दुसरे सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणते? तर जगातील दुसरे सर्वात खोल मेट्रो स्टेशन युक्रेन येथील कीव शहरात आहे, यालाच आर्सेनलना म्हणूनही ओळखतात. हे मेट्रो स्टेशन 105.5 मीटर खोलीवर बांधण्यात आलेले जगातील दुसरे सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी एस्केलेटरवरच पाच मिनिटांचा वेळ लागतो. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धादरम्यान या स्टेशनचा वापर बॉम्ब निवारा म्हणून केला होता.