Mahindra Thar 5-Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतात त्यांची 3 डोअर ऑफ रोडींग एसयूव्ही कार लॉन्च करण्यात आली आहे.

आता महिंद्राकडून त्यांच्या थार एसयूव्ही कारचे 5 डोअर व्हेरियंट लॉन्च करण्यात येणार आहे.

महिंद्रा 5 डोअर थार एसयूव्ही कार अनेकदा भारतीय रस्त्यावर चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. महिंद्रा 5-डोअर थारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु करण्यात आले आहे.

चाचणी दरम्यान महिंद्रा 5 डोअर थार एसयूव्ही कारचे काही तपशील लीक झाले आहेत.

महिंद्रा 5 डोअर थार एसयूव्ही कारचा व्हीलबेस बदलण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच नवीन थार ऑफ रोडींग एसयूव्हीमध्ये एक सनरूफ देखील स्पष्ट दिसत आहे. नवीन थार एसयूव्ही कारमध्ये 5 दरवाजे दिले जाणार आहेत.

महिंद्रा 5 डोअर थार एसयूव्ही कारमध्ये 10-इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाणार आहे.

सध्याच्या 3 डोअर थार एसयूव्ही कारमध्ये 7-इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येत आहे.

थार एसयूव्ही कारमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील आणि आकर्षक फ्रंट लूक दिला जाणार आहे. स्कॉर्पिओ N आणि XUV700 एसयूव्ही कारसारखे सनरूफ कारमध्ये दिले आहे.

सध्या 3 डोअर थार एसयूव्ही कारमध्ये देण्यात येणारे 3 इंजिन नवीन थारमध्ये दिले जाऊ शकतात. कारमध्ये 2.2-लिटर 4-सिलेंडर mHawk डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 130 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच दुसरे 1.5-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 118 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते.

तर तिसरे 2.0-लिटर 4-सिलेंडर mStallion पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 150 bhp पॉवर आणि 300 टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

या इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.

नवीन 5 डोअर थार एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

नवीन थार मारुती सुझुकी जिमनी आणि आगामी 5-डोर फोर्स गुरखा शी स्पर्धा करेल. 2024 च्या मध्यापर्यंत 5 डोअर थार एसयूव्ही कार लॉन्च केली जाईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *