Mysterious Places In India : प्रवासाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रवाशाचा मूड वेगळा असतो. अनेक लोक धार्मिक सहलीला जातात, तर अनेकांना हिल स्टेशनवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात भटकायला आवडते. अनेक पर्यटक मॉलला भेट देण्याचा आनंद घेतात, तर अनेकांना ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले पाहण्यात आनंद मिळतो.

अशातच असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना रहस्यमय ठिकाणांना भेट द्यायला आवडते. या पर्यटकांना अशी ठिकाणे जवळून बघायला आवडतात, जिथे सूर्यास्तानंतर जाण्यास मनाई असते, जी ठिकाणे झपाटलेली आहे. शतकानुशतके चालत आलेल्या या ठिकाणांमागे दंतकथा आणि कथा प्रचलित आहेत. तुम्हालाही रहस्यमय ठिकाणांना भेट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल आज सांगणार आहोत, जिथे प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा इतिहास आहे आणि कधी कधी हा इतिहास इतका भयानक आहे की ऐकूनच तुमचे होश उडतील. चला तर मग भारतातील या झपाटलेल्या ठिकांबद्दल जाणून घेऊया.

भानगड किल्ला

bhangad fort
bhangad fort

भानगडचा किल्ला राजस्थानात आहे. हे इतके रहस्यमय ठिकाण आहे की त्याबद्दल तुम्हाला अनेक कथा आणि किस्से सापडतील. सूर्यास्तानंतर या ठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. इथे संध्याकाळच्या वेळी विचित्र अनुभव येतात, असे इथे सांगितले जाते. संध्याकाळच्या वेळी येथे थांबणाऱ्याचा मृत्यू होतो, असेही म्हटले जाते. त्यामुळेच भानगडचा किल्ला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत खुला राहतो. यानंतर या किल्ल्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा किल्ला बघायचा असेल तर भानगडचा किल्ला दिल्लीपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे.

रस्त्याने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. जर तुम्ही ट्रेनने भानगड जाणार असाल तर तुम्ही अलवर येथे उतरू शकता आणि नंतर येथे जाण्यासाठी टॅक्सी पकडू शकता. लक्षात घ्या सूर्यास्तानंतर तुम्हाला येथे भेट देण्याची परवानगी दिली जाणार नाही, म्हणून त्यापूर्वी या किल्ल्याला भेट द्या.

शनिवार वाडा

shaniwar wada
shaniwar wada

शनिवार वाडा पुण्यात आहे. हे एक अतिशय रहस्यमय आणि भितीदायक ठिकाण आहे. या किल्ल्यात नारायण राव नावाच्या 13 वर्षीय राजपुत्राची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांचा आत्मा किल्ल्यात भटकत असल्याचे बोलले जाते. रात्री येथे लहान मुलांच्या रडण्याचे आवाज ऐकू येतात. हा किल्ला बाजीराव पेशव्यांनी बांधला, ज्यांनी मराठा-पेशवे साम्राज्य मोठ्या उंचीवर नेले. हा किल्ला १७३२ मध्ये पूर्ण झाला. शनिवारी या वाड्याचा पाया रचला गेला, म्हणूनच या वाड्याला शनिवार वाडा म्हणतात. आता हा किल्ला मोडकळीस आला असून हे आता एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

अग्रसेन की बावली

agresar ki bavoli
agresar ki bavoli

अग्रसेन की बावली दिल्ली येथे आहे. येथील शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. ही बावली एक संरक्षित स्मारक आहे आणि दिल्लीतील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अग्रसेन की बावली पहिल्यांदा कधी बांधली गेली याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. ही बावली अग्रोहाचा राजा महाराजा अग्रसेन याने बांधली असे म्हणतात. ज्यांच्या नावावरून या बावलीचे नाव पडले.

चौदाव्या शतकात अग्रवाल समाजाने त्याची पुनर्बांधणी केली. ही पायरी विहीर केवळ जलाशय म्हणून नव्हे तर सामुदायिक ठिकाण म्हणूनही बांधली गेली. त्या काळातील महिला या विहिरीवर जमत असत आणि येथील थंड वातावरणात विसावा घेऊन उष्णतेपासून सुटका करून घेत असत असे मानले जाते. या
बावलीची लांबी 60 मीटर आणि रुंदी 15 मीटर आहे.

संपूर्ण रचना खडक आणि दगड वापरून तयार केली आहे. इथे 100 हून अधिक पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला पाण्याच्या पातळीपर्यंत घेऊन जातात आणि तुम्ही खाली गेल्यावर थरार वाढतो. वरून ही बावली लाल वाळूच्या दगडाने बनवलेल्या भिंतींमुळे खूप सुंदर दिसते, पण पर्यटक पायऱ्या उतरताच एक विचित्र प्रकारची भीती आणि थरार कायम राहतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *