Personal Loan Interest Rate : अलीकडे वाढती महागाई आणि बदललेली जीवनशैली यामुळे नोकरदार वर्गाला महिन्याकाठी येणारा पगार पुरत नसल्याचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना पुढील महिन्याचा पगार येईपर्यंत उसनवारीने पैसे घ्यावे लागतात. अशातच एखादी मोठी अडचण आली तर अनेकांना वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते.

मात्र जाणकार लोक वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन जेव्हा कुठूनच पैशांची ॲडजस्टमेंट होत नसेल तेव्हाच घ्यावे असा सल्ला देतात. त्याचे कारण म्हणजे पर्सनल लोन साठी आकारले जाणारे व्याजदर हे खूपच अधिक असते. यामुळे सर्वसामान्यांना हे व्याजदर परवडत नाही. यामुळे सर्वसामान्य लोक कर्जाच्या बोजाखाली दाखले जातात.

तसेच जाणकार लोकांनी जर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर ज्या बँका सर्वात स्वस्त व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहेत त्यांच्याकडूनच घ्यावे असे सांगितलं आहे. अशा परिस्थितीत आज आपण अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या स्वस्त व्याजदर राहत ग्राहकांना पर्सनल लोन पुरवत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.


स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवणाऱ्या देशातील पाच बड्या बँका

HDFC Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. पब्लिक सेक्टर मधील एसबीआय ही जशी मोठी बँक आहे तसेच खाजगी क्षेत्रात एचडीएफसी बँकेचा बोलबाला आहे. ही बँक भारतातील सर्वात सुरक्षित बँकांमध्ये समाविष्ट आहे. आरबीआय ने अलीकडेच सांगितल्याप्रमाणे देशातील सर्वात सुरक्षित तीन बँकांमध्ये एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचा समावेश होतो. विशेष म्हणजे ही बँक ग्राहकांना स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज देखील देते. या बँकेकडून किमान 10.50% व्याजदराने पर्सनल लोन मिळते.

आयसीआयसीआय बँक : खाजगी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक. ही बँक देखील देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांमध्ये समाविष्ट आहे. या बँकेचे संपूर्ण देशभरात ब्रांचेस आहेत. या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे. वैयक्तिक कर्जासाठी ही बँक किमान 10.65% एवढे व्याज आकारत आहे.

कोटक महिंद्रा बँक : ही देखील देशातील एक लोकप्रिय बँक असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या बँकेकडून ग्राहकांना किमान 10.99% व्याज दराने वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे.

इंडसइंड बँक : ही बँक देखील ग्राहकांना वैयक्तिक कर्ज ऑफर करते. या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जावर खूपच कमी व्याज घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार ही बँक वैयक्तिक कर्जासाठी किमान 10.25% एवढे व्याज आकारत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया : भारतातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक म्हणून ज्या बँकेचा गौरव होतो ती बँक म्हणजे SBI. या बँकेकडून ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे. मात्र बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी किमान 12.30% एवढे व्याज आकारले जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *