VIP Car Number : प्रत्येकजण नवीन कार घेतल्यानंतर व्हीआयपी नंबर प्लेट मिळावी यासाठी धरपड करत असतो. मात्र व्हीआयपी नंबर प्लेट घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे अनेकजण व्हीआयपी नंबरसाठी अर्ज करत नाहीत.

व्हीआयपी नंबर खरेदी करून नवीन कार इतरांपेक्षा जरा हटके दिसली पाहिजे असे वाटते. तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर देखील त्यांच्या कारकडे पडली पाहिजे असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे अनेकजण व्हीआयपी नंबर खरेदी करत असतात.

सध्या तरुणांमध्ये व्हीआयपी नंबर प्लेट खरेदी करण्याची क्रेझ जरा जास्तच पाहायला मिळते. जर तुम्हालाही तुमच्या नवीन कारसाठी व्हीआयपी नंबर हवा असेल तर तुम्ही तो सहज मिळवू शकता. घरबसल्या तुम्ही व्हीआयपी नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकता.

व्हीआयपी नंबर प्लेटसाठी आरटीओ कार्यालयाकडून बोली लावली जाते. तसेच जो ग्राहक जास्त पैसे देईल त्याला तो नंबर दिला जातो. चला तर जाणून घेऊया घरबसल्या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करायचा.

सर्वात प्रथम तो नंबर उपलब्ध आहे की नाही जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या कारसाठी हवा असलेला व्हीआयपी नंबर उपलब्ध आहे की नाही हे तपासावे लागेल.
तुम्हाला तुमच्या आवडता व्हीआयपी नंबर उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर वेबसाइट ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला नंबर सर्च करण्यासाठी बार दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यांनतर तुमचे राज्य निवडा तसेच तुमच्या जवळचे आरटीओ कार्यालय निवडा.
आता तुमच्याकडे कॅप्चा कोड असेल, तो भरा आणि त्यानुसार कोणताही व्हीआयपी नंबर शोधा.
तुम्ही उपलब्धता तपासा वर क्लिक केल्यावर तुम्हाला क्रमांकाची माहिती मिळेल.

व्हीआयपी क्रमांकासाठी नोंदणी कशी करावी

तुम्हाला व्हीआयपी क्रमांक हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला प्रथम parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर फॅन्सी नंबर सेक्शनवर क्लिक करा.
लॉग इन करा, नोंदणी करा, नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून साइन अप करा.
आता मुख्य मेनूमधील वापरकर्ता इतर सेवा विभागात नंबरनुसार शोधा वर क्लिक करा.
आता तुम्हाला खरेदी करायचा असलेला नंबर निवडा आणि E Auction वर क्लिक करा.
आता नोंदणी बटणावर क्लिक करा, एक फॉर्म भरा आणि फी भरा.

व्हीआयपी नंबरसाठी बोली कशी लावायची

तुम्ही लिलाव पद्धतीने देखील व्हीआयपी नंबर खरेदी करू शकता. तुमच्या आवडत्या व्हीआयपी नंबरला तुम्ही बोली लावून तो खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लिलावात सहभागाची व्हावे लागेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *