Bank News : अलीकडे डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी बाजारात विविध डिजिटल पेमेंट एप्लीकेशन देखील उपलब्ध झाल्या आहेत. फोन पे, पेटीएम, गुगल पे, अमेझॉन पे यांसारख्या नानाभित डिजिटल पेमेंट एप्लीकेशन च्या माध्यमातून आता पैशांचे व्यवहार होऊ लागले आहेत.
आता यूपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी आज देखील अनेक जण इंटरनेट फ्रेंडली नसल्याने रोकड व्यवहार करतात. त्यामुळे देशात कॅशने व्यवहार करणाऱ्यांची संख्या अजूनही विशेष उल्लेखनीय आहे.
यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात बँकेतील पैसे काढण्यासाठी एटीएम चा वापर होतो. मात्र एटीएम ने पैसे काढताना ग्राहकांना काही शुल्क देखील द्यावे लागते. दरम्यान आता आपण एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन प्रमुख बँकांच्या ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढताना किती शुल्क द्यावे लागते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआयच्या ग्राहकांना किती शुल्क द्यावे लागते ?
एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. पब्लिक सेक्टर मधील या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना एटीएम देखील उपलब्ध करून दिले जात आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना एका महिन्यात एटीएममधून पाच व्यवहार मोफत पूर्ण करता येतात. त्यामध्ये आर्थिक आणि गैर आर्थिक व्यवहाराचा समावेश होतो. एका महिन्यात ही लिमिट क्रॉस झाल्यानंतर मात्र एसबीआय एटीएम धारकांना एसबीआय एटीएममधून प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी दहा रुपयांचे अतिरिक्त शुल्क लागते. तसेच दुसऱ्या बँकेचे एटीएम असेल तर प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी 20 रुपये प्लस जीएसटी शुल्क लागते.
एचडीएफसी ग्राहकांना किती शुल्क द्यावे लागते
एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेचे नाव आवर्जून घेतले जाते. एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांना एचडीएफसी एटीएम मधून दर महिन्याला पाच वेळा मोफत व्यवहार करता येतात.
तसेच दुसऱ्या एटीएम मधून मेट्रो शहरात 3 आणि नॉन मेट्रो शहरातून पाच व्यवहार करता येतात. ही लिमिट क्रॉस केल्यानंतर मात्र ग्राहकांकडून प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये गैर आर्थिक व्यवहारासाठी साडेआठ रुपये शुल्क आकारले जाते.