Vastu Tips : तुम्हीही तुमच्या घरामध्ये दररोज देवी-देवतांची पूजा करत असाल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देवी देवतांची पूजा केली जाते. मात्र ही पूजा करत असताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे देवी-देवता त्यांच्यावर नाराज होतात आणि घरामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात.
घरामध्ये देवाची पूजा करत असताना अनेक नियम पळाले पाहिजेत. तसेच पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक देखील आहे. वास्तुशास्त्रामध्ये देवाची पूजा करताना अनेक नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच घरामधील देवाचे मंदिर कोणत्या दिशेला असावे, तसेच देव घरातील मंदिराच्या दरवाजाची दिशा कोणत्या बाजूला असावी हे देखील वास्तुशाश्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच पूजा करताना अनेकांकडून नकळत अनेक चुका होत असतात त्या चुका होऊ नयेत यासाठी देखील वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
तुम्ही देखील दररोज देवाची पूजा करत असताना अनेक गोष्टी जमिनीवर ठेवत असाल तर हे अजिबात करू नका. जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्यावर देखील देव नाराज होऊ शकतात.
पूजा करताना या वस्तू जमिनीवर ठेवू नका
देवाचा दिवा जमिनीवर ठेऊ नका.
अनेकदा पूजा करत असताना देवाचा दिवा जमिनीवर ठेवला जातो. असे करणे अशुभ मानले जाते. देवाचा दिवा लावल्यानंतर तो कधीही जमिनीवर ठेऊ नये. तो देवघरात ताटात किंवा तांदळामध्ये ठेवावा. अन्यथा तुमच्यावर देखील देवाचा कोप पाहायला मिळू शकतो.
शाळीग्राम जमिनीत ठेवू नये
शाळीग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे ते कधीही जमिनीवर ठेऊ नये. तुळशीच्या रोपासोबत शाळीग्राम ठेवणे शुभ मानले जाते. तसेच शिवलिंग देखील जमिनीवर ठेवू नका असे करणे देखील तुमच्यासाठी अशुभ मानले जाते.
शंख जमिनीवर ठेवू नका
तुमच्या देवघरात असलेला शंख कधीही जमिनीवर ठेऊ नये. माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंना शंख खूप प्रिय आहे अशी मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे. जमिनीवर शंख ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे ते नेहमी लाल रंगाच्या कपड्याच्या वर ठेवा.
देव आणि देवीचे चित्र जमिनीवर ठेवू नये
तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देव आणि देवीचे चित्र कधीही जमिनीवर ठेऊ नका. असे करणे देव आणि देवींचा अपमान मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. असे फोटो नेहमी उच्च स्थानावर ठेवा.