Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेस विषयी विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे आज सहा नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सहा गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या हे 40 वर जाणार आहे. आज सुरु होणाऱ्या 6 गाड्यांमध्ये मुंबई ते जालना दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. सध्या राज्यात एकूण सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.
यामध्ये आज आणखी एका गाडीची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संख्या 7 वर पोहोचणार आहे. अशातच आता पुणे आणि मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
नवीन वर्षात पुणे आणि मुंबईहुन विदर्भातील संत गजानन महाराजांच्या देवस्थानासाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव हा प्रवास गतिमान होणार आहे.
अद्याप याबाबत रेल्वे बोर्डाने अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे माहिती काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
संत गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील भाविक दरवर्षी लाखोंच्या संख्येने दाखल होत असतात.
शेगावला येणाऱ्या भाविकांमध्ये मुंबई आणि पुण्यातील भाविकांची संख्या मात्र अधिक उल्लेखनीय आहे. हेच कारण आहे की या मार्गावर आता ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून मे 2024 पर्यंत देशभरातील 35 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना वंदे भारत एक्सप्रेसची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याच अनुषंगाने मध्य रेल्वे कडून देखील प्रस्ताव मागितले गेले होते. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केला आहे.
विशेष बाब म्हणजे रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे देखील बोलले जात आहे. यामुळे आता रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेचे या प्रस्तावावर केव्हा शिक्कामोर्तब होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.