Vande Bharat Sleeper Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरासाठी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानीतल्या रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे राजधानी मुंबईमधल्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि गतिमान होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. खरेतर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे.
ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली. आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सूरु झाली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल असे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे या 41 पैकी जवळपास पाच वंदे भारत ट्रेन एकट्या मुंबईमधून सुरू आहेत.
मुंबईमधून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की, वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी सर्वप्रथम देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून सुरू होणार आहे. म्हणजेच वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला मान महाराष्ट्राला देण्यात येणार आहे.
राज्यातील मुंबई ते राजस्थानमधील महत्त्वाचे शहर जोधपुर दरम्यान ही पहिली गाडी सुरू होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
ही गाडी राष्ट्रीय राजधानी दिल्ली मार्गे चालवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत आरामदायी आणि जलद होण्यास मदत मिळणार आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक राहणार असा दावा केला जात आहे. यामुळे या गाडीने जरी सर्वसामान्यांचा प्रवास आरामदायी आणि जलद होणार असला तरी देखील यासाठी अधिकचा खर्च देखील करावा लागणार आहे.