Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक लोकप्रिय ट्रेन आहे. ही गाडी देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातही आत्तापर्यंत सात वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एवढेच नाही तर वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता पाहता आता स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू केली जाणार आहे. ही पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होऊ शकते याबाबत काही मीडिया रिपोर्ट्समधून महत्त्वाची अपडेट देखील समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची सर्वप्रथम देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राज्य राजधानी मुंबई शहराला भेट मिळणार आहे.
ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते जोधपूर आणि मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे.
यामुळे राजधानी मुंबईमधील नागरिकांचा राजस्थान मधील जोधपुर ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली कडील प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी आणि जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
स्लीपर क्लास वंदे भारत एक्स्प्रेस लांब पल्ल्यासाठी उत्कृष्ट ठरेल असे बोलले जात आहे. ही गाडी येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च 2024 नंतर केव्हाही सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. त्यासाठी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गातही सुधारणा करण्यात येत आहे.
दरम्यान, या ट्रेनचे भाडे राजधानी एक्सप्रेसपेक्षा 20 टक्के जास्त राहणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकडे दराप्रमाणेच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसच्या तिकीट दरावरुनही सर्वसामान्यांमध्ये नाराजी पाहायला मिळू शकते.
दरम्यान वंदे भारत स्लीपर कोचमधील सर्व डबे वातानुकूलित असण्याची शक्यता आहे. या गाडीत सर्व हायटेक फिचर्स राहणार आहेत.