Vande Bharat Express : देशात सुपरहिट ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय प्रवाशांच्या माध्यमातून देखील ही लोकप्रिय गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे निवेदन दिले जात आहे. सध्या देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस मुळे संबंधित मार्गातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच आता पुणे, सोलापूर आणि नागपूर शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
कारण की या तिन्ही शहरांना आता वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरे तर आधी देखील या तिन्ही शहरांना वंदे भारतची भेट मिळालेली आहे. सोलापूर आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई ते सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
गेल्या वर्षी सुरु झालेली ही एक्सप्रेस पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. शिवाय नागपूर ते बिलासपूर आणि इंदूर ते नागपूर या दरम्यान सुरू झालेली गाडी नागपूरवासीयांसाठी फायदेशीर ठरत आहे.
परिणामी या शहरांमधील नागरिकांचा प्रवास जलद झाला असून त्यांना वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करता येणे शक्य झाले आहे. दरम्यान सोलापूर विकास मंचाने सोलापूर ते नागपूर, सोलापूर ते गोवा, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी केली आहे.
खरे तर पुणे ते सिकंदराबाद ही गाडी देखील सोलापूरमार्गे धावणार आहे. यामुळे या गाडीचा सोलापूर वासियांना मोठा फायदा होणार आहे. सध्या या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस धावत असून शताब्दी एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी ही हायस्पीड ट्रेन चालवावी अशी मागणी आहे.
विशेष म्हणजे मध्य रेल्वे कडून याबाबत बोर्डाकडे पाठपुरावा देखील केला जात आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यांच्याकडे सोलापूर विकास मंचाने ही मागणी केली आहे.
त्यामुळे आता सोलापूर विकास मंचाची ही मागणी पूर्ण होते का आणि महाराष्ट्राला या तीन वंदे भारत एक्सप्रेस मिळतात का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.