Travel Tips : उन्हाळ्यात तुम्ही नेहमीच थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन आखत असता. यावेळी तुम्ही आणि तुमचे मित्र अशा ठिकाणी जाण्याची तयारी करता जिथे बर्फवृष्टी आहे किंवा ती थंड जागा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडेल. हे ठिकाण दुसरे कोणते नसून, भारतातील काश्मीर ज्याला स्वर्ग म्हणतात. आज आम्ही तुम्हाला येथील अशा ठिकांणाबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्हाला जायला नक्कीच आवडेल.
गुलमर्ग बायोस्फीअर रिझर्व्ह
तुम्ही तुमच्या मित्रांसह काश्मीरला जेव्हा जाल तेव्हा गुलमर्ग बायोस्फीअर रिझर्व्हला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला रेड फॉक्स, हंगुल आणि बिबट्यासारखे अनेक हिमालयीन प्राणी पक्षी पाहायला मिळतील. हे ठिकाण काश्मीरची राजधानी श्रीनगरजवळ आहे. इथे तुम्हाला अनेक सुंदर गोष्टी पाहायला मिळतील.
डल झील
यासोबतच तुम्ही काश्मीरमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या दल सरोवरालाही भेट देऊ शकता. येथे तुम्ही तलावातील बोटीचा आनंद घेऊ शकता. यासोबतच इथून हिमालयही पाहता येतो. तलावाच्या मधोमध येथील प्रसिद्ध केहवाचाही आनंद तुम्ही घेऊ शकता.