Tourist Spot Maharashtra : कालपासून नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. 2023 ला निरोप देऊन आता आपण सारे जण नवीन वर्षात आलो आहोत. नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प सुद्धा घेतले आहेत.
काही लोकांनी दुर्गमोहिमांवर जाण्याचा संकल्प घेतला आहे. तर काही लोकांनी नवीन वर्षात मनमुराद आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे. या नवीन वर्षात अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडणार आहे.
काहीजण लॉन्ग ट्रिप काढण्याच्या तयारीत आहेत तर काहींनी आपल्या राज्यातीलच काही प्रमुख पर्यटन स्थळे एक्सप्लोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
काहीजण किल्ल्यांवर देखील भेटी देणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण नवीन वर्षात भेटी देता येणाऱ्या महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कलावंतीण दुर्ग : महाराष्ट्रातील हा एक प्रमुख दुर्ग आहे. दुर्गप्रेमींना या दुर्गविषयी माहिती आहेच. जर तुम्ही ही नवीन वर्षात किल्ल्यांवर जाण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर हा किल्ला तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या किल्ल्यावर जाऊन तुम्ही चित्त थरारक अनुभव आपल्या नजरेत कैद करू शकणार आहात.
पनवेल पासून हाकेच्या अंतरावर वसलेला हा किल्ला मात्र थोडासा धोकादायक आहे. काही ट्रेकर्स या किल्ल्यावरून पडून मरण पावले आहेत. यामुळे पनवेल पासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेल्या कलावंतीन दुर्गाववर जर तुम्ही जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर सावधगिरीने ट्रेकिंगचा आनंद लुटा.
हरिहर किल्ला : हरिहर किल्ला हा नासिक पासून चाळीस किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. हा महाराष्ट्रातील चढाईसाठी सर्वात अवघड किल्ला आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नवीन वर्षात या किल्ल्याला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.
येथे जाऊन तुम्हाला नक्कीच स्वर्गासारखा अनुभव मिळणार आहे. येथे मे महिन्यात करवंदाचा रानमेवा हमखास खायला मिळतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला सह्याद्रीची शान आहे.
कळसुबाई शिखर : महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर म्हणून कळसुबाई शिखरला संपूर्ण जगात ओळख प्राप्त आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे त्या पाठोपाठ साल्हेर हा किल्ला सर्वाधिक उंचीच्या शिखराच्या यादीत दुसऱ्या स्थानावर येत आहे.
प्रतापगड : हा ऐतिहासिक किल्ला सातारा जिल्ह्यातील आहे. प्रतापगड किल्ल्याला खूपच महत्त्व प्राप्त आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला होता. दरम्यान जर तुम्हाला ही नवीन वर्षात ट्रेकिंग साठी एखाद्या दुर्गला भेट द्यायची असेल तर हा दुर्ग तुमच्यासाठी निश्चितच एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.