Tourist Places Pune : गेल्या महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारपीट झाली. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पडणारी कडाक्याची थंडी गायब झाली.
डिसेंबर ची सुरुवात सुद्धा अवकाळी पावसानेच झाली. यामुळे हिवाळा सुरू आहे की हिवसाळा हा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानाने विलक्षण कलाटणी घेतली आहे.
आता हवामान पूर्वपदावर आले असून कडाक्याच्या थंडीला सुद्धा सुरुवात झाली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमान किंचित कमी झाले असून गारठा वाढू लागला आहे. यामुळे आता हिवाळ्यात फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
ज्याप्रमाणे पावसाळ्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. तशीच गर्दी हिवाळ्यात देखील पर्यटन स्थळांवर होत असते. जर तुम्हीही हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे.
कारण की आज आपण पुण्याजवळील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांना बाबत जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही पुण्याजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी निश्चितच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
सिंहगड किल्ला : जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असेल तर सिंहगड किल्ला तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. दुर्गप्रेमींसाठी सिंहगड किल्ला हा स्वर्गापेक्षा कमी नाही. जर तुम्हालाही दुर्ग, गडकोट किल्ले यांची आवड असेल तर तुम्ही एकदा सिंहगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या. हा किल्ला पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर वसलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा किल्ला समुद्रसपाटीपासून जवळपास ४४०० फूट उंचीवर तयार करण्यात आला आहे. यामुळे या किल्ल्यावरून उघड्या डोळ्याने दूरवरचा मुलूख सहजतेने टिपता येतो.
पवना तलाव : पुणे आणि मुंबईतील पर्यटकांसाठी पवना तलाव हा फिरण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्पॉट आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. जर तुमचाही कुठे फिरण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या तलावाला नक्कीच भेट दिली पाहिजे.
लोणावळा : पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून लोणावळ्याची ओळख आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. देश विदेशातून येथे पर्यटक येतात आणि आपला कॉलिटी टाईम स्पेंड करतात. राजधानी मुंबई पासून रस्ते मार्गाने 96 किलोमीटर लांबीवर आणि पुण्यापासून अवघ्या 64 किलोमीटर लांबीवर बसलेले हे लोणावळा पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जर तुमचा कुठे फिरण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही पुण्याजवळील या ठिकाणाला एकदा नक्कीच भेट द्या.