Tourist Place In Maharashtra : कडाक्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबांसोबत फिरायला जाण्याचा बेत करतात. परंतु अनेकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या तरी कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी ते समजत नाही. प्रत्येकाचे बजेट जास्त नसते.
त्यामुळे त्यांना इच्छा असूनही कुठेही फिरायला जाता येत नाही. मात्र तुम्ही आता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणांना सहज भेट देऊ शकता. ही ठिकाणे खूप लोकप्रिय असून दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. दरम्यान कोणती आहेत ही ठिकाणे? पहा त्यांची यादी.
आर्थर लेक
आर्थर लेक खूप सुंदर असून जो प्रवर नदीच्या पाण्याने तयार झाला आहे. हा मुख्यतः विल्सन धरणाचा जलाशय असून तो डोंगर आणि जंगलांनी वेढला आहे. असे असल्याने आर्थर लेक पर्यटकांसाठी एक उत्तम कॅम्पिंग ठिकाण बनले आहे. या ठिकाणी पर्यटक बोट राईडचा आनंद घेतात तसेच निसर्ग छायाचित्रण करू शकतात.
विल्सन डॅम
भंडारदरा या ठिकाणी असणारे विल्सन डॅम हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून हे देशातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण आहे. हे धरण प्रवरा नदीवर समुद्रसपाटीपासून 150 मीटर उंचीवर बांधले असून ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत जाऊ शकता.
कळसूबाई पर्वत
हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून जे १६४६ मीटर उंचीवर आहे. त्यामुळे या ठिकाणाला ‘महाराष्ट्राचा एव्हरेस्ट’ असेही म्हटले जाते. ट्रेकर्ससाठी हे ठिकाण एक लोकप्रिय ठिकाण आहे. त्याच्या शिखरावर ट्रेकिंग करून, पर्यटकांना त्याच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेता येतो. हा ट्रॅक पाहिजे तितका नाही.
कळसूबाई मंदिर
कळसूबाई पर्वताला भेट देत असताना कळसूबाई मंदिराला भेट द्या. हे मंदिर त्याच नावाच्या स्थानिक देवतेला समर्पित असून मंदिराजवळ वार्षिक जत्रा भरते इतकेच नाही तर या ठिकाणी स्थानिक लोक आणि पर्यटक येथे प्रार्थना करण्यासाठी येत असतात.