Posh Areas in Pune : एरंडवणे हे पुण्याच्या दक्षिण भागात नियोजनात्मक वसलेले एक प्रमुख आणि पॉश निवासी परिसर आहे. प्रसिद्ध शाळा, रुग्णालये,

मॉल्स, रेस्टॉरंट आदी सुखसुविधा आणि कोथरूड, बाणेर आणि विमाननगर सारख्या रोजगार केंद्रांशी मजबूत कनेक्टिव्हिटी एरंडवणेच्या निवासी क्षेत्राला चालना देत आहे.

शांत व हिरवाईने नटलेला एरंडवणे परिसर सदाशिव पेठ, दत्तवाडी, शीला विहार कॉलनी, बुधवार पेठ, गुलटेकडी अशा बस्तीने वेढलेला आहे, एरंडवणेमध्ये प्रामुख्याने निवासी सदनिकांचा समावेश आहे.

येथे अनेक नांमाकित बांधकाम निवासी प्रकल्प आहेत. शिवाय, एरंडवणे हे कमला नेहरू पार्क, फायर ब्रिगेड संग्रहालय, दशभुजा गणपती मंदिर आणि जोशींचे लघु रेल्वे संग्रहालय यासाठी प्रसिद्ध आहे.

एरंडवणे शहराला कोथरूडसह इतर महत्त्वाच्या भागांशी जोडणारा कर्वे रस्ता हा प्रमुख रस्ता आहे. कोथरूडमधील प्रसिद्ध सावरकर उड्डाणपूल एरंडवणेपासून १ किमीपेक्षा कमी अंतरावर आहे आणि तो पुढे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता या दोन प्रमुख मागांना जोडतो.

यामुळे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होते. तेथून सातारा, मुंबई येथे सहज जाता येते. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, कर्वे रस्ता आणि फर्ग्यूसन कॉलेज रस्त्याने ४ किमी अंतरावर आहे आणि प्रमुख पुणे रेल्वे स्टेशन ६ किमी अंतरावर आहे.

एरंडवणे येथून एअरपोर्ट रस्तामार्गे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (१४ किमी) जाता येते. शिवाय वनाज-रामवाडी मेट्रोमार्गही येथून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

परिसरातील निवासी अपार्टमेंट या सर्व सुविधासंपन्न आहेत आणि मुख्य म्हणजे त्या सर्व आरोग्य सुविधांच्या जवळ आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एसीई हॉस्पिटल आदी हॉस्पिटल्स बंथ आहेत. याशिवाय एरंडवणे येथे सर्व खरेदीसाठी लागणारे सेंट्रो मॉल, रिलायन्स स्मार्ट सारख्या लोकप्रिय शॉपिंग आउटलेटपैकी एक ते ४ किमी अंतरावर आहे.

शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध असलेला परिसर

एरंडवणे परिसर प्रसिद्ध शैक्षणिक संस्थासाठी ओळखले जाते. एरंडवणे येथे गरवारे कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ कॉमर्स, अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल, द राउटर स्कूल, सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल यांसारख्या अनेक शैक्षणिक आस्थापना आहेत.

जवळपासची रोजगार केंद्रे

एरंडवणेला प्लॅटिनम टेक पार्क, पंचशील, क्लस्टर ए, ईओन आयटी पार्क आणि इंटरनॅशनल टेक पार्क, पुणे, खराडी यासारख्या अनेक प्रसिद्ध टेक पार्कमध्ये सहज प्रवेश आहे. तसेच, हिंजवडीला येथून सहज जाता येते. येथे पर्सिस्टंट सिस्टम्स, हाविंगर सिस्टम्स, टेक महिंदा इत्यादीसारख्या अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *