Real Estate : वाकड, पिंपळे निलखला पुणे, औंध परिसराबरोबर कनेक्ट असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेतील पिंपळे निलखला मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाल्याने या भागात घर घेण्यासाठी सर्वाचीच धडपड असते
त्यातल्या त्यात हिंजवडी आयटी पार्क मध्ये काम करणा-यांसह शासकीय नोकरवर्गाचा कल या भागात राहणीमानाला कायमच पसंती देत आला आहे.
पिंपरी मुंबई-बंगळूर अर्थात देहरोड-कात्रज बाह्यवळण मार्गामुळे वाकड व पिंपळे निलख ही गावे मुख्य प्रवाहात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची त्यांना साथ मिळाली. हिंजवडी आयटी पार्कमुळे ‘डिमांड’ वाढली.
महापालिकेने रस्त्यांचे जाळे विणले. कनेक्टिव्हिटी वाढली, सोईसुविधा आल्या. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या बेगवेगळ्या भागात जाण्यासाठी पीएमपी बससेवा सुरू झाली.
आलिशान सदनिकांचे गृहप्रकल्प साकारू लागले आणि आष्टीयन्ससह अन्य नोकरदार, व्यावसायिकांनीही पसंती दिली. आजही बहुतांश नागरिक घर घेण्यासाठी या भागाला पसंती देत आहेत.
पिंपळे निलख या गावाच्या कडेनी मुळा नदी वाहते. साधारण दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती होती. आता मुख्य ठिकाणं व बाजारपेठ झाली आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकासाची वाटचाल करू लागली.
कालांतराने हिजवडी आयटी पार्क झाले. त्यामुळे या परिसरातील राहणीमान उंचावले आणि आयटीयन्सनी राहण्यासाठी पसंती दिली. मोठमोठे गृहप्रकल्प साकारू लागले. काहींनी गुंठ्याने जागा घेऊन घरे बांधली.
आता स्मार्ट सिटी व अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. उर्वरित शेतीवरही गृहप्रकल्प स्वकारू लागले आहेत शिवाय, सांगवी-रावेत बीआरटी, नाशिक फाटा-याकड बीआरटी,
औध-हिंजवडी मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि अंतर्गत प्रशस्त रस्ते यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मोठमोठे मॉल्स, मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स अशा सुविधांमुळे या भागातील घरांना मागणी वाढली आहे.
दोन्ही शहराचा भाग म्हणून विकसित
पिपळे निलख हा पिपरी महापालिकेत समाविष्ठ भाग असला तरी याधी कनेक्टीव्हिटी पुणे, औंध, वाणेर बालेवाडी भागाशी अधिक आहे. विशालनगर भागातील नागरिक वालेवाडी, बाणेर भागात व्यवसाय करताना दिसून येत आहेत.
तर बहुतांश सरकारी नोकदारवर्ग पुणे पिपरी चिंचवड महापालिकेत नोकरी करीत आहेत, पुण्याची हद्दी संपते आणि पिंपरी चिंचवडची हद्द सुरू होतो त्यामुळे हा भाग दोन्ही शहरासाठी महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे.