Citroen Berlingo : Citroen India लवकरच भारतीय बाजारपेठेत आपल्या 7 सीटर कारपैकी एक लॉन्च करणार आहे. देशात पूर्वी 7 सीटर वाहनांची खूप क्रेझ होती आणि आताही तेवढीच आहे. या सेगमेंटमध्ये आता फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ही नवीन 7 सीटर कार Berlingo लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार नवीन EMP2 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. हे Berlingo Standard आणि Berlingo XL या दोन मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

Citroen Berlingo इंजिन

या कारची लांबी 4400 मिमी आणि रुंदी 4750 मिमी आहे. तसेच या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. यात 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 108 Bhp कमाल पॉवर निर्माण करते. यासोबतच यात 1.5 लीटर डिझेल इंजिनही देण्यात आले आहे. हे इंजिन 128 Bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. तसेच याला 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने जोडण्यात आले आहे.

Citroen Berlingo वैशिष्ट्ये

या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, कंपनीने सिग्नेचर फ्रंट ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प दिले आहेत. यासोबतच मागील आणि पुढच्या बंपरवर ब्लॅक क्लेडिंग आणि स्टील व्हील देण्यात आले आहेत. कंपनी क्रूझ कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एबीएस, ईएससी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, डिजिटल स्पीडोमीटर यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये या कारमध्ये पाहता देण्यात येणार आहेत.

Citroen Berlingo किंमत

तुमच्या माहितीसाठी सध्या कंपनीने त्याच्या किमतींबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात लॉन्च करू शकते. तसेच ही कार 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच लॉन्च झाल्यानंतर ही कार रेनॉल्ट ट्रायबरसारख्या वाहनांना थेट स्पर्धाही देऊ शकते.

“या” गाड्यांशी थेट स्पर्धा करेल

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. तिची 7 सीटर कार Ertiga देशातील सर्वाधिक विकली जाणारी MPV आहे. अशा परिस्थितीत, लॉन्च झाल्यानंतर, बर्लिंगो देशातील एर्टिगाशी स्पर्धा करू शकते. बर्लिंगो आधीच काही युरोपियन देशांमध्ये आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *