Picnic Spot In Maharashtra : पावसाळा सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी वेळे आधीच मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील महिन्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. दरम्यान येत्या पावसाळ्यात अनेकजण पर्यटन स्थळांवर गर्दी करणार आहेत. पावसाळा लागला की, पर्यटकांची पावले आपोआप पर्यटन स्थळांकडे वळत असतात.

पावसाळा ऋतू हा सर्वात सुंदर ऋतू असून या काळात पर्यटनस्थळांवर धबधबे सुरु होतात, धबधब्यांवरून पाणी पडू लागते, तलावात पाणी वाढते, पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते.

यामुळे अनेक जण पावसाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असतात. दरम्यान जर तुमचाही येत्या पावसाळ्यात पिकनिकचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पिकनिक स्पॉटची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण पावसाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट असणाऱ्या पिकनिक स्पॉटची माहिती पाहणार आहोत.

भंडारदरा : पावसाळी काळात पिकनिक साठी महाराष्ट्रातील बेस्ट डेस्टिनेशन मध्ये भंडारदराचा देखील समावेश होतो. राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या जिल्ह्यात अर्थातच अहमदनगर जिल्ह्यात वसलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

पावसाळा ऋतूत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येथे दररोज हजारो पर्यटक गर्दी करतात. पावसाळा सुरू होताच क्षणी येथे काजवा महोत्सव भरतो. या महोत्सवाला देशभरातील पर्यटक येथे गर्दी करतात.

भीमाशंकर : भंडारदरापासून जवळच असणारे भीमाशंकर देखील पर्यटकांमध्ये खूपच फेमस आहे. पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर हे पर्यटनक्षेत्र सुद्धा पावसाळ्यात खूपच मनमोहक बनत असते. हे घनदाट अरण्य असलेलं एक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आणि समृध्द असं ठिकाण आहे.

भंडारदरा प्रमाणेच भीमाशंकर येथील धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा पावसाळ्यात याच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर घालण्याचे काम करतात.

चिखलदरा : चिखलदरा हे विदर्भ विभागातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पावसाळ्याच्या काळात विदर्भासहित संपूर्ण राज्यभरातील पर्यटक चिखलदऱ्यात गर्दी करत असतात.

महाराष्ट्रात तुम्हाला अनेक थंड हवेचे ठिकाणे पाहायला मिळतील. मात्र चिखलदऱ्याची बातच काही और आहे. सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार किमी उंचीवर असलेल्या या ठिकाणाला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *