Real Estate in Pune : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील सर्वप्रथम नियोजनबद्धरीत्या विकसित झालेली नागरी वसाहत म्हणून निगडी प्राधिकरणाची ओळख आहे.

प्राधिकरणाने या पेठांमध्ये रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, तसेच सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव करून भूखंड वाटप केले. शहरातील राहण्यासाठी सर्वाधिक सोयीस्कर आणि योग्य असा हा परिसर आहे.

या भागात खास करून बंगले रो-हाऊस असून आता पुर्नविकास होऊन छोटे गृहप्रकल्प साकारले जात आहेत.

पुणे-मुंबई या औद्योगिक पट्टयात झालेला विकास, शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने हजारोंचे स्थलांतर यातून लोकसंख्यावाढ व नागरी सुविधांमध्ये वाढ होऊ लागली. पिंपरी-चिचवडमध्ये एमआयडीसीमुळे कारखानदारी आली. अनेक देशी-विदेशी उद्योग, त्यांच्यावर अवलंबून हजारो लघुउद्योग यामुळे कामगार च नोकरदार वर्ग इथे स्थायिक झाला.

या कामगारांची परिसरातच निवासाची व्यवस्था व्हावी, हा उद्देश समोर ठेवून राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपूर्वी शहरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण १९७२ मध्ये स्थापन केले.

नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून ४२ निवासी पेठा, चार मध्यवर्ती व्यापार केंद्रे अशा सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी ३२ निवासी पेठा विकसित झाल्या. या पैठापैकी नियोजबध्दरित्या विकसित झालेला परिसर म्हणजे निगडी प्राधिकरण परिसर आहे.

प्राधिकरणाने सुरुवातीला काही निवासी इमारती बांधून वितरित केल्या. तर, काही ठिकाणी निवासी भूखंडाची विक्री केली. त्यामध्ये नागरिकांनी घरे बांधली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज,

सांडपाणी अशा मूलभूत सुविधांसह प्राधिकरणात उद्याने, क्रीडांगणे अशा सुविधा आहेत. प्राधिकरण्याच्या एका बाजुने जुना पुणे-मुंबई महामार्ग, तर दुसऱ्या बाजुने रेल्वे मार्ग आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशन या भागातील नागरिकांसाठी सोयीस्कर आहे. नुकतेच निगडीमध्ये महापालिकेने प्रशस्त असे गतिमा नाट्यगृह उभारलेले आहे. मोठ मोठ्या शिक्षणसंस्थांची शाळा, महाविद्यालये या परिसरात व इथून जवळपास आहेत. नियोजित विकासस क्रीडा, सांस्कृतिक जडणघडण असलेला हा संपूर्ण परिसर राहण्यायोग्य शहरातील सर्वोत्तम भाग म्हणून ओळखला जातो.

शासनाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून पुणे प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यानंतर पीएमआरडीएचा कारभार या भागातून सुरू झाला. परंतु, प्राधिकरणाचा विकसित झालेल्या पेठा महापालिकेकडे वर्ग केलेल्या आहेत.

येथील रहिवाशी या भागात घरे व इमारतींचा पुर्नविकास करत आहेत, मात्र, येथील जागा तत्कालीन प्राधिकरण प्रशासनाकडून नागरिकांना ९९ वर्षाच्या भाडेकराराने दिलेल्या आहेत. त्या फ्रो होल्ड करून म्हणजे

घरमालकांच्या नावे करणे व त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, ही येथील रहिवाश्यांची प्रमुख मागणी आहे. तसे झाल्यास या भागात घरांचा पुर्नविकास करणे व गृहप्रकल्प साकारणे देखील शक्य होणार आहे.

सर्वाधिक उद्याने, दुर्गादेवी टेकडी अन् अप्पूधर

पिपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक उद्याने असेलला परिसर म्हणून निगडी प्राधिकरणाची ओळख आहे. उद्याने, प्रशस्त खेळाची मैदाने या परिसरात आहेत, त्यापैकी निगडी व देहू कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीवर महापालिकेने दुर्गादेवी उद्यान विकसित केलेले आहे, हे उद्यान शहराची ओळख बनले आहे.

सुमारे ७० पेक्षा अधिक एकरवर ही टेकडी पसरलेली आहे. टेकडीवर लाखो देशी-विदेशी वृक्ष असून त्यामुळे टेकडी हिरवाईने नटलेली आहे. याच टेकडीच्या पायथ्याशी अप्पूचर हे खेळांचे उद्यान आहे, पुणे शहरातील सर्वात मोठे खेळांचे व मनोरंजनाचे उत्थान म्हणून अप्पूघरची ओळख आहे.

भक्ती-शक्ती समूहशिल्प शहराचे प्रवेशद्वार

मुंबईकडून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाची हद्द संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडची हद्द सुरू होते. तेथे विकसित चौक विकसित झाला. या ठिकाणी महापालिकेने संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे समूहशिल्प उभारले असून हा चौक भक्ती-शक्ती चौक म्हणून प्रसिध्द आहे.

ते शहराचे प्रवेशव्दार असून या शिल्पासासून निगडी प्राधिकरणाचा परिसर सुरू होता. या चौकातून जुन्या पुणे-मुंबई या महामार्गासह पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई बैंगलोर महामार्गाशी शहर जोडले जाते. तर, आषाढी वारीनिमित्त दरवर्षी देहहून पंढरपूरला जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इथूनच शहरात प्रवेश करतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *