Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन कार लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे.

2024 या चालू वर्षात त्यांच्या इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल कार भारतात लाँच केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या ऑटोमॅटिक CNG कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. तसेच 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Curvv एसयूव्ही कारचे इलेक्ट्रिक मॉडेल आणि Harrier EV देखील सादर केली आहे.

मात्र आता कंपनीकडून लवकरच भारतात Curvv EV आणि Harrier EV कार लाँच केली जाणार आहे. हॅरियर एसयूव्ही कारचे इलेक्ट्रिक मॉडेल 2024 च्या शेवटी लाँच केले जाणार आहे. तर त्याआधी Curvv EV कार लाँच केली जाणार आहे.

टाटा मोटर्सकडून या दोन कारच्या लाँचबाबत काही खुलासा करण्यात आला आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांची पंच EV कार लाँच केली आहे. या कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी अधिक भर दिल्याचे दिसत आहे.

पंच EV कारला Nexon EV च्या खाली स्लॉट देण्यात आला आहे तर Curvv EV आणि Harrier EV ला Nexon EV च्या वर स्लॉट दिला जाणार आहे. Curvv EV लाँच केल्यानंतर टाटा मोटर्स या कारचे पेट्रोल व्हेरियंट देखील सादर करणार आहे.

Curvv EV कार येत्या दोन ते तीन महिन्यात सादर करण्याची तयारी टाटा मोटर्सकडून करण्यात येत आहे. तसेच पेट्रोल व्हेरियंट देखील 2024 मध्येच सादर करण्याचे धेय्य टाटा मोटर्सकडून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

Curvv EV

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Curvv EV एसयूव्ही कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या जाणार असल्याची अपेक्षा आहे.

Harrier EV

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Harrier EV कार या वर्षाच्या शेवटी लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये देखील दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात येणार आहेत. मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक सर्व-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, एकाधिक एअरबॅग्ज, कॅपेसिटिव्ह HVAC असे फीचर्स दिले जाऊ शकतात. Harrier EV देखील 500 किमीपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *