पंतप्रधान पीक विमा योजनेत सुमारे आठ हजार कोटींची अनियमितता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. स्वतःच्या अवयव विक्रीतून कर्जमाफी मिळावी, अशी मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी पंतप्रधान पीक योजनेतील गैरव्यवहारावर बोट ठेवले. संबंधित शेतकऱ्यांनी गुरुवारी खासदार विनायक राऊत यांची मातोश्री’वर भेट घेतली. […]