Summer Tourist Place In Maharashtra : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. अशातच उन्हाळा म्हटलं की प्रचंड ऊन, वाढत जाणारी उष्णता आणि त्यामुळे शरीराची अक्षरशः लाही लाही होते. अशातच अनेकांना या दिवसात फिरायला जाण्याची इच्छा तयार होते.
तुम्ही आता विदेशात न जाता आता तुम्ही महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. जी तुमच्या सहज बजेटमध्ये बसू शकतात. त्यामुळे तुमचा आनंदही द्विगुणित होईल. तुम्ही यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील काही ठिकाणांना भेटी शकता. पहा त्यांची यादी.
उन्हाळ्याच्या दिवसात द्या या पर्यटन स्थळांना भेटी
1) महाबळेश्वर
महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांसाठी महाबळेश्वर हे आवडीचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
या ठिकाणी तुम्ही हेड पॉइंट, चायनामन फॉल्स, महाबळेश्वर मंदिर, धोबी फॉल्स, वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला तसेच टायगर स्प्रिंग्स यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
2) भंडारदरा
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे नाशिकपासून ७२ किमी अंतरावर असणारे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच ते कळसूबाई पर्वताचे सर्वोच्च शिखर म्हणून प्रसिद्ध आहे.
पर्यटक छत्री धबधबा, रंधा धबधबा, रतनवाडी गाव यासारखी ठिकाणे पाहण्यासाठी येतात. आता तुम्हीही या ठिकाणी भेट देऊ शकता. कारण हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक पर्यटन ठिकाण आहे.
3) आंबोली
आंबोली हे महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखण्यात येते. तर या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, आंबोली हा महाराष्ट्राचा एक भाग असून या ठिकाणाची माहिती फार कमी लोकांना आहे. त्यामुळे या ऑफबीट डेस्टिनेशनची सहल तुमच्यासाठी खूप आरामदायी आहे.
घनदाट जंगलात आणि सपाट पर्वतरांगांमध्ये असणारे हे हिल स्टेशन देशातील निवडक हिल स्टेशनचा यादीत समावेश आहे. या ठिकाणाहून तुम्हाला अरबी महासागराचे उत्तम दृश्य पाहायला मिळत आहे. आंबोली या ठिकाणाहून समुद्राचे चित्तथरारक दृश्य पाहण्यासोबतच तुम्ही महादेवगड पॉइंट, पूर्विचा वास, कोकण किनारा तसेच नागट्टा फॉल्स, नारायण गड आणि बॉक्साईट माईन्सला यांसारख्या ठिकाणांना सहज भेट देऊ शकता.
4) मालवण
महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला छोटा हा किनारपट्टीचा प्रदेश उन्हाळ्यात भेट देण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही समुद्रकिनाराप्रेमी असाल तर ज्यांना पाणी आणि जल साहसी क्रियाकलाप करायला आवडत असेल तर मग या उन्हाळ्यात मालवणचा प्लॅन जरूर करावा.
आता महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला अनेक रोमांचक गोष्टी करता येतील.
5) इगतपुरी
इगतपुरी हे महाराष्ट्राच् हिल स्टेशनच्या सौंदर्यात काही कमी नाही. जर तुम्ही निसर्गप्रेमी असल्यास इगतपुरी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
गोंगाट तसेच प्रदूषित वातावरणापासून काही दिवस आरामात घालवण्यासाठी इगतपुरी आणि त्याचे सौंदर्य हे उत्तम संयोजन असू शकते. या ठिकाणी तुम्ही किल्ले, नदी, धबधबे आणि वन्यजीव अभयारण्य आदींचा आनंद घेऊ शकता. जे अनेक जुन्या भारतीय वारशाच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात.
6) पवना लेक कॅम्पिंग
जर तुम्हालाही शांत आणि नितळ वातावरणात बसून सुंदर तलावाच्या दृश्याचा आनंद घ्यायचा असल्यास महाराष्ट्र राज्यातील पवना तलाव हा उत्तम पर्याय आहे. लोणावळा हिल स्टेशनजवळ असणाऱ्या या सुंदर तलावाच्या काठावर तुम्हाला कुटुंब किंवा जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवता येतो.
समजा तुम्ही केवळ 1-2 दिवसांसाठी भेट देण्याच्या विचारात असल्यास तरी हे ठिकाण तुम्हाला निराश करणार नाही. घनदाट जंगलांनी वेढणाऱ्या या पवना तलावाच्या काठावर कॅम्पिंग करण्यासोबतच तुम्हाला लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला इत्यादी ठिकाणांनाही भेट देता येते.
7) लोणावळा
महाराष्ट्र राज्याच्या प्रवासाच्या ठिकाणात लोणावळ्याचे नाव नेहमीच असते, लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील असेच एक हिल स्टेशन असून जे उन्हाळ्याचे उत्तम ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिरवळ, धबधबे, पर्वत आणि हृदयस्पर्शी दृश्यांसह लोणावळा तुमच्यासाठी आवर्जून भेट देतात.
मुंबईपासून हे ठिकाण एकूण 96 किमी तर पुणे शहरापासून हे ठिकाणी 64 किमी अंतरावर आहे. तसेच हे हिल स्टेशन लेण्यांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर लोणावळ्याच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत जसे की कुणे धबधबा, आंबी व्हॅली, भिवपुरी, जुम्मापट्टी धबधबा, पवना तलाव, लोणावळा तलाव, राजमाची किल्ला इ. या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता.