Summer Holiday : उन्हाळ्याच्या सुट्ट्या येताच आपण या दगदगीच्या जीवनातून थोडा काळ विश्रांती घेणयासाठी बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवतो. पण सर्वांसमोर एकच प्रश्न येतो तो म्हणजे जायचे कुठे? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आम्ही अशा 5 ठकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही अगदी आनंदात तुमच्या सुट्ट्या एन्जॉय करू शकाल.
मनाली
उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण शोधत असाल तर मनाली हे नाव सर्वप्रथम समोर येते. मनाली हे ठिकाण हिमाचल प्रदेश येथील असून ते नैसर्गिक आकर्षणांसाठी ओळखले जाते. उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देणे अनेकांना आवडते. जर तुम्ही थंड हवेचे ठिकाण शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, झॉर्बिंग, क्वाड बाइकिंग तसेच नैसर्गिक ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. तसेच येथे काही जुनी मंदिरे देखील आहेत.
शिमला
थंड हवेचे दुसरे ठिकाण म्हणजे शिमला. शिमला हे राष्ट्रीय महामार्गांद्वारे नवी दिल्ली आणि चंदीगड सारख्या शेजारच्या शहरांशी जोडलेले आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. शिमल्यात द मॉल रोड, द रिज आणि क्रिस्ट चर्च ही खास ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त शिमल्यात, द शिमला स्टेट म्यूज़ियम, हिमालयन बर्ड पार्क, किआला फॉरेस्ट, समर हिल्स अशी अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.
माउंट अबू
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. राजस्थानच्या कोरड्या वाळवंटात, माउंट अबू हे ताज्या हवेच्या श्वासासारखे आहे. माउंट अबू हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1,722 मीटर उंचीवर आहे, जे अरवली टेकड्यांच्या सर्वोच्च बिंदूव आहे. महाराजांच्या राजवटीत राजघराण्यांसाठी हे सर्वात आवडते सुट्टीचे ठिकाण असायचे.
हे vसर्वात जास्त थंड आणि सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक उन्हाळ्यात याठिकाणी भेट देतात. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या हिल स्टेशनमध्ये अनेक हिरवीगार जंगले, आणि तलाव आहेत, तसेच माउंट अबू अनेक धार्मिक स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे . याठिकाणी अचलगढ़ किल्ला, अर्बुदा देवी मंदिर, टॉड रॉक, हनीमून पॉइंट, ब्रधबधबे ह्माकुमारी पिस पार्क अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. जर तुमचे नवीन लग्न झालं असेल किंवा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनाचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला येथे जाणे आरामशीर आणि आनंददायी असेल.
दार्जिलिंग
दार्जिलिंग पश्चिम बंगाल राज्याच्या उत्तरेस स्थित आहे आणि पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी स्थित आहे. हे समुद्रसपाटीपासून 2134 मीटर उंचीवर वसलेले आहे आणि विविध बौद्ध मठांनी आणि हिमालयातील पराक्रमी शिखरांनी वेढलेले आहे. येथील दऱ्या अतिशय आकर्षक आहेत आणि हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. दार्जिलिंग केवळ चहामुळेच जगभर प्रसिद्ध नाही, तर आपल्या सौंदर्यामुळेही हे शहर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. इथले बहुतेक रहिवासी बौद्ध आहेत आणि दार्जिलिंगमध्ये नेपाळी आणि बंगाली भाषा बोलल्या जातात. दार्जिलिंगमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, सोबतच येथे खरेदीसाठीही चांगला पर्याय आहे. यामुळेच दर महिन्याला लाखो लोक दार्जिलिंगला भेट देतात.
लोणावळा
उन्हाळ्यात लोक घराबाहेर पडणे टाळतात. उन्हाळ्यात उच्च तापमान आणि कडक उन्हामुळे लोक प्रवासाचे नियोजन करत नाहीत. तथापि, प्रवासाची आवड असलेल्या लोकांना जवळजवळ प्रत्येक महिन्याला सहलीला जायचे असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उन्हाळ्यात सहलीला जायचे असेल तर अशा ठिकाणी जा, जेथे हवामान आल्हाददायक असेल आणि तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळेल. जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही शहराचे रहिवासी असाल तर या मोसमात तुम्ही मित्र आणि कुटुंबासह लोणावळ्याला भेट देऊ शकता. तुमची सुट्टी घालवण्यासाठी लोणावळा हे सर्वोत्तम हॉलिडे स्पॉट आहे. येथे तुम्ही छोट्या सहलीला जाऊ शकता. लोणावळ्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात, जे येथील सुंदर मंदिराला भेट देतात. तसेच तेथील वातावरणाचा आनंद घेतात.