Sumer Travel Destinations : सध्या उन्हाचा पारा खूप वाढत आहे. अशातच उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जायला कोणाला आवडत नाही ? सध्याच्या काळात असे खूप कमी लोकं आहेत ज्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत फिरायला जायला आवडत नाही.
मात्र बऱ्याचदा अनेकांना सुट्ट्या मिळत नाही तर कधी परफेक्ट डेस्टिनेशन ठरत नाही त्यामुळे त्यांचे प्लॅन्स रद्द होतात. असे असल्याने उन्हाळ्याची सुट्टी आणि परफेक्ट टुरिस्ट प्लेस यांचा योग जुळून येणे महत्त्वाचे असते. जर तुम्हीही फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणांना भेटी द्या.
या उन्हाळ्यात द्या या ठिकाणांना भेट
सध्या उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे असून जर तुम्ही आता तुमच्या यादीत थंड ठिकाणांचा समावेश करू शकता. जसे की मनाली, शिमला, नैनिताल, औली, लडाख, काश्मीर, दार्जिलिंग, गंगटोक, उटी, गुलमर्ग, मसुरी इ. ठिकाणांचा तुम्हाला समावेश करता येईल.
ही आहेत सर्वात थंड ठिकाणे
थंड ठिकाणांमध्ये सिक्कीम, लडाख, गंगटोक, गुलमर्ग, काश्मीर या ठिकाणांचा समावेश आहे, जी तुम्हाला कडाक्याच्या उन्हाळ्यात थंडीचा अनुभव देईल.
ही आहेत भारतातील सर्वात स्वस्त ठिकाणे ?
समजा तुम्ही उन्हाळ्यात भेट देण्यासाठी स्वस्त ठिकाणांच्या शोधत असाल, तर गोवा, ऋषिकेश, अलेप्पी, जयपूर, उदयपूर, दार्जिलिंग, पाँडिचेरी, नैनिताल, जैसलमेर, कसोल, पुष्कर, तसेच उटी, मॅक्लिओडगंज, गोकर्ण, लोणावळा आणि कोडाईकनाल ही काही चांगली ठिकाणे आहेत.
सर्वात लोकप्रिय ठिकाणे
सर्वात जास्त भेट दिल्या गेलेल्या या ठिकाणांमध्ये दिल्ली, त्यानंतर आग्रा, जयपूर, दार्जिलिंग, काश्मीर, गोवा, लेह/लडाख या ठिकाणांचा समावेश आहे.
तसेच असोला भाटी वन्यजीव अभयारण्य, सूरजकुंड, अलवर, दमदमा तलाव, आग्रा-ताजमहाल तसेच भानगढ, मुर्थल, मथुरा, वृंदावन, नीमरणा किल्ला या ठिकाणी तुम्ही दिल्लीहून एका दिवसात या भेट देऊ शकता.