Strawberry Farming India : लालचुटक स्ट्रॉबेरी खाने कोणाला आवडत नाही. तुम्हालाही लालबुंद स्ट्रॉबेरी खायला आवडते ना ? मग आज आपण भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर उन्हाळ्यात बाजारपेठांमध्ये स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात आवक होते. स्ट्रॉबेरीला चांगला बाजारभावही मिळतो. ग्राहकांची स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळते.
विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
अशा परिस्थितीत भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहजिकच आहे. दरम्यान आता आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या राज्यात घेतले जाते स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक उत्पादन
स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे जे लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच आवडते. स्ट्रॉबेरीची लागवड ही जवळपास सर्वच देशांमध्ये केले जाते असं म्हटलं तरी चालेल. मात्र स्ट्रॉबेरीची सर्वात आधी फ्रान्स या देशात लागवड केली गेली होती.
यानंतर टप्प्याटप्प्याने जगातील इतरही देशात स्ट्रॉबेरीची शेती सुरू झाली. भारतातही अनेक राज्यांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र देशाच्या फक्त पाच राज्यांमध्ये एकूण उत्पादनापैकी 90 टक्के उत्पादन घेतले जाते.
या पाच राज्यांमध्ये हरियाणा या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. हरियाणा मध्ये देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 31.50% स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते.
दुसरीकडे आपल्या महाराष्ट्राचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. आपल्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 24.25% एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते.
याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीर या राज्याचा नंबर लागतो. जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 20.93 एवढे दर्जेदार स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतले जाते.
मिजोरम या राज्यात 7.99% एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते आणि या यादीत या राज्याचा चौथा क्रमांक लागतो. दुसरीकडे मेघालय या राज्याचा या यादीत पाचवा क्रमांक लागतो, येथे 7.91% एवढे स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते.