Sikkim Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय, लग्नसराईचा सीजन सुरू आहे. यामुळे सध्या देशभरातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसात फिरण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण भारतातील एका प्रसिद्ध पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक विदेशात पर्यटनासाठी जात असतात.
पण आपल्या भारतातही अशी अनेक पिकनिक स्पॉट आहेत जिथे पर्यटक भेटी देऊन त्यांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतात. असेचं फेमस पिकनिक स्पॉट आहे सिक्कीम. यावर्षी सिक्कीमला भेटी देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
लडाख ज्याप्रमाणे पर्यटकांमध्ये फेमस आहे तसेच सिक्कीम देखील पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक येत असतात.
जर तुमचाही नजीकच्या भविष्यात कुठे पिकनिकला जाण्याचा बेत असेल तर सिक्कीम हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. दरम्यान, आता आपण सिक्कीम मध्ये फिरण्यासारखे कोणकोणते ठिकाण आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सिक्कीममध्ये कुठं-कुठं भेटी देणार ?
सिक्कीममध्ये तुम्हाला ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. येथील हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये तुम्हाला ट्रेकिंग आणि पॅराग्लाइडिंगचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक देखील फिरण्यासारखी आहे.
या राजधानीत पर्यटकांच्या दृष्टीनं अनेक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, लाचुंग या छोट्याशा गावाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. हे एक असं सुंदर अन नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे गाव आहे जिथून तुम्हाला हिमालयाचं मनाला भारावून टाकणार मनमोहक दृश्य पाहता येणार आहे.
तसेचं, लाचुंगमधील दऱ्या-खोऱ्या, ओढे, जंगल आणि येथील निसर्गसौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे. तुम्ही येथे एकदा गेला तर सातत्याने जावत राहावे असे वाटणार आहे. सिक्कीममधील ‘फुलों की घाटी’ हे खोर देखील पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.
याला युमथांग खोरं म्हणतात. गंगटोकपासून हे ठिकाण 148 किमी अंतरावर वसलेले आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींची फुले पाहायला मिळतात यामुळे याला फुलो की घाटी म्हणून ओळखले जाते.
याशिवाय, लांचेन हे देखील सिक्कीम मधील एक सुंदर ठिकाण आहे. या गावाला तुम्ही कधी भेट दिली तर तुम्हाला स्वर्गासारखा अनुभव येणार आहे.