SBI Home Loan : जर तुम्हीही नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी गृह कर्ज घेण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर, आपलेही एक स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिलेले असते.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या असल्याने हे स्वप्न पूर्ण करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. जिवाचा आटापिटा करूनही घरांसाठी आवश्यक पैसा उभा होत नाहीये. अशावेळी मग गृह कर्जाचा पर्याय स्वीकारला जातो.
देशातील अनेक बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये एसबीआय या पब्लिक सेक्टर बँकेचा देखील समावेश होतो. दरम्यान, आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर
एसबीआय या पब्लिक सेक्टर बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये होम लोन दिले जात आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना 9.15% ते 9.65% यादरम्यानच्या रेटवर होम लोन पुरवत आहे.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना एसबीआय बँकेकडून किमान 9.15 टक्के या व्याजदरात होम लोन उपलब्ध होते.
जर समजा एखाद्या ग्राहकाला 9.15% या व्याजदरात 50 लाख रुपयांचे कर्ज 25 वर्ष कालावधीसाठी मिळाले तर सदर व्यक्तीला 42 हजार 475 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला 77 लाख 42 हजार 379 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच सदर व्यक्तीला मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम असे एकूण एक कोटी 27 लाख 42 हजार 379 रुपये भरावे लागणार आहेत.
जर समजा एखाद्या ग्राहकाला 30 लाख रुपयांचे कर्ज याच व्याजदरात मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 25,485 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
या कालावधीत सदर ग्राहकाला 46 लाख 25 हजार 427 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच सदर ग्राहकाला मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 76 लाख 25 हजार 427 रुपये भरावे लागणार आहेत.