SBI Home Loan Details : जर तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता जे लोक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेकडून अर्थातच एसबीआयकडून होम लोन घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे.
खरे तर भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या 12 पैकी एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.
बँकेचे करोडो कस्टमर असून बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्तात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान आज आपण एसबीआय बँक आपल्या ग्राहकांकडून गृह कर्जासाठी किती व्याजदर आकारते आणि जर बँकेकडून 25 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर कितीचा ईएमआय भरावा लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती व्याजदर आकारते ?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या State Bank Of India होम लोन साठी 9.15% ते 9.65 टक्के एवढं व्याज आकारत आहे.
ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा ग्राहकांना किमान 9.15% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध होऊ शकते.
मात्र, यासाठी ग्राहकांना कर्जाच्या प्रकरानुसार 2,000 रुपयापासून ते 10 हजार रुपयांपर्यंतचे प्रोसेसिंग चार्ज द्यावे लागते.
अशा परिस्थितीत, जर SBI कडून एखाद्याने 25 लाख रुपये गृह कर्ज घेतले तर त्याला किती EMI भरावा लागेल हे आता आपण जाणून घेणार आहोत.
जर एखाद्या ग्राहकाने 25 लाख रुपये होम लोन घेतले आणि 30 वर्षाची फेड ठेवली तर अशा ग्राहकाला मासिक ईएमआय 20,386 रुपये एवढा द्यावा लागणार आहे.
या कर्जासाठी तुम्हाला एकूण 48.3 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजे हे घर तुम्हाला 73.3 लाख रुपयाला पडणार आहे.