SBI FD Scheme : एसबीआय ग्राहकांसाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. विशेषतः एसबीआय मध्ये एफडी करणाऱ्यांसाठी आजची बातमी मोठी फायद्याची ठरेल.
एसबीआय ही एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक. देशात एकूण 12 पीएसबी आहेत. यामध्ये एसबीआय ही सर्वात मोठी पीएसबी म्हणून ओळखली जाते. ही पब्लिक सेक्टर बँक एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे.
यामुळे एसबीआयमध्ये एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 400 दिवसांच्या एफडी योजनेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना बँकेकडून किती व्याज दिले जात आहे, यामध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळणार ? याविषयी आज आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
एसबीआयची 400 दिवसांची एफडी स्कीम
एसबीआय ही देशातील एक सुरक्षित बँक आहे. आरबीआयने सुरक्षित बँकेच्या यादीत एसबीआयचा समावेश केला आहे. एसबीआयकडून आपल्या ग्राहकांसाठी चारशे दिवसांची एफडी स्कीम लॉन्च करण्यात आली आहे.
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.1% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. हे बँकेकडून कोणत्याही एफडी योजनेसाठी दिले जाणारे सर्वाधिक व्याज आहे.
जर या एफ डी स्कीम मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर अर्थातच चारशे दिवस पूर्ण झाल्यानंतर तीन लाख 23 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
म्हणजेच या एफ डी योजनेतून मॅच्युरिटी वर 23 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. विशेष बाब अशी की ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी जर या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 0.50 टक्के अधिकचे व्याजदर देखील मिळणार आहे.
अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी म्हणजे चारशे दिवसांच्या एफडी साठी 7.60% एवढे व्याजदर दिले जात आहे.
म्हणजे यात ज्येष्ठ नागरिकांनी जर तीन लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 3 लाख 26 हजार रुपयांच्या आसपास रक्कम मिळणार आहे. यामध्ये 26 हजार रुपये हे व्याज राहणार आहे.