Rental Homes In Pune : राज्यातील पुणे, नासिक आणि मुंबई या शहरांना सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या सुवर्ण त्रिकोणातील पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे.

शिवाय येथे विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले असल्याने याला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील फारच पूरक वातावरण आहे.

म्हणून येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी येतात. अलीकडे विविध आयटी कंपन्यांनी शहरात आपला व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे शहराला आयटी हब अशी नवीन ओळख मिळाली आहे.

एकंदरीत शिक्षणानिमित्त आणि नोकरी व्यवसायासाठी देशातील विविध शहरातून हजारो नागरिक येथे दाखल होत आहेत. परिणामी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी येत असल्याने आता शहरात प्रॉपर्टीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्यामुळे पुण्यात शिक्षणासाठी आणि नोकरी धंद्यासाठी येणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या दरात भाड्याचे घर शोधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

शहरात आल्यानंतर पुण्यात स्वस्तात भाड्याचे घर कुठे मिळणार हा मोठा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आज आपण पुणे शहरात स्वस्तात रेंटल होम्स कुठे मिळणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुण्यात कुठे मिळणार स्वस्तात भाड्याचे घर

कात्रज : जर तुम्हीही राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत कमी भाड्याने घर शोधत असाल तर कात्रज तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील कात्रज परिसरात वन बीएचके भाड्याच्या घरासाठी 7000 ते 8400, टू बीएचके साठी 8000 ते 12000 आणि थ्री बीएचके साठी 12000 ते 25 हजार रुपये मोजावे लागतात.

हिंजवडी : आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी येथे परवडणाऱ्या दरात भाड्याची घरे मिळतात. या ठिकाणी वन बीएचके घरासाठी 8000 ते 14000, टू बीएचके घरासाठी 14000 ते 22000 आणि थ्री बीएचके घरासाठी 22000 ते 30 हजार रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागू शकते.

धनकवडी : पुण्यातील हा परिसर निवासी मालमत्तेसाठी आणि राहण्यासाठी खूपच उत्कृष्ट आहे. या भागात कमी भाड्यात घर मिळते. येथे वन बीएचके साठी पाच हजार 800 ते बारा हजार, टू बीएचके घरासाठी 12 हजार ते 20 हजार आणि थ्री बीएचके घरासाठी वीस हजार ते 25 हजार रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागू शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *