Reliance Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या ही एअरटेल आणि Vi पेक्षा खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी एअरटेलने अलीकडील काही महिन्यांमध्ये जिओला चांगली टक्कर दिली आहे.

एअरटेलची ग्राहक संख्या देखील आता हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे आता या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे.

परिणामी जिओच्या माध्यमातून आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे स्वस्त आणि आकर्षक प्लॅन लॉन्च केले जात आहेत.

दरम्यान आज आपण देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या अर्थातच जिओच्या अशा एका प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या प्लॅन विषयी सविस्तर माहिती.

कोणता आहे तो प्लॅन ?

जिओने 395 चा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी अधिक फायद्याचा ठरतो ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे. कारण की, या प्लॅन सोबत 5G स्मार्टफोन असलेल्या ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ मिळतो.

खरंतर या रिचार्ज प्लॅन सोबत फक्त सहा जीबी डेटा मिळतो. हा डेटा एका दिवसातही संपवला जाऊ शकतो आणि 84 दिवसातही. मात्र ज्या ग्राहकांकडे 5G स्मार्टफोन आहे त्यांना या प्लॅन सोबत अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे.

तसेच या प्लॅन सोबत 1000 sms आणि अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड याचे सबस्क्रीप्शन देखील मिळते.

मात्र तुम्हाला जर या प्लॅनने रिचार्ज करायचा असेल तर तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मग My Jio ॲप्लिकेशनवरून रिचार्ज करावे लागणार आहे. पेटीएम, फोन पे यांसारख्या एप्लीकेशनमध्ये हा प्लॅन तुम्हाला दिसणार नाही.

एकंदरीत ज्या लोकांचा 5G स्मार्टफोन आहे आणि त्यांना भरपूर इंटरनेट स्वस्तात हवे आहे अशांसाठी हा 84 दिवसांचा व्हॅलिडीटी असणारा रिचार्ज प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे.

या प्लॅनमुळे ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटचा एक्सेस मिळणार आहे. परंतु जिथे 5G सुरू झाले आहे तिथेच या अनलिमिटेड इंटरनेटचा वापर ग्राहकांना करता येणार आहे. जिथे अजून 5G सुरू झालेले नाही तिथे या प्लॅनचा फारसा उपयोग होणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *