RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती “अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक” पदांसाठी होत आहे. यामध्ये एकूण 294 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरती मोहिमेअंतर्गत अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व इतर पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी 24 मे & 09 जून 2023 (पदांनुसार) पर्यंत अर्ज करायचे आहेत.

पदाचे नाव

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक पदाच्या एकूण 294 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी उमेदवारांनी भरती सूचना वाचूनच यासाठी अर्ज करायचे आहेत.

नोकरी ठिकाण

ही भरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धती 

-अधिकारी (ग्रेड बी) पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

-प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार, प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतो.

महत्वाच्या तारखा

अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी उमेदवार 09 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शकतात. तर प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक पदासाठी उमेदवार 24 मे 2023 पर्यंत पोस्टाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचे आहेत.
-अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-वरील पदांकरिता अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
-या भरतीसाठी अर्ज करताना अर्जदाराने सर्व आवश्यक पात्रता जोडणे देखील महत्वाचे आहे. अन्यथा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.
-अधिक माहितीसाठी www.rbi.org.in ला भेट द्या.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे किल्क करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *