RailTel Corporation of India Bharti 2023 : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती “पदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंता” पदांच्या एकूण 23 रिक्त जागांवर होणार असून उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या उमेदवार येथे 16 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो.
महत्वाचे अपडेट
पदाचे नाव – ही भरती पदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंता पदांसाठी होत आहे.
पद संख्या – या भरती अंतर्गत एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा – यासाठी उमेदवार 18 ते 27 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो.
अर्ज पद्धती – यासाठी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया – या भरती करिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – या भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी www.railtelindia.com या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने (नोंदणी)अर्ज करायचे आहेत.
-इच्छुकआणि पात्र उमेदवारांनी BOAT च्या www.mhrdnats.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
-ज्या उमेदवारांनी स्वतःची नोंदणी केली आहे आणि ज्यांचे अर्ज www.mhrdnats.gov.in या पोर्टलवर शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन प्राप्त झाले आहेत अशा उमेदवारांचाच विचार केला जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
भारती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.