Haunted Places In Pune : तुम्हाला Haunted ठिकाणांना भेट द्यायला आवडते का? जर तुम्हाला आवडत असेल तर पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला भयानक अनुभव मिळेल. राजवाड्यांपासून थिएटर आणि स्मशानभूमींपर्यंत अनेक ठिकाणी तुम्हाला नकारात्मक शक्ती जाणवेल. पुणे शहरात विचित्र अशा घटना आहेत, ज्याचेकिस्से शहरभर प्रसिद्ध आहेत. पुण्यातील अशाच विचित्र ठिकाणांबद्दल ऐकून तुमचे होश उडतील. चला तर थोडासाही उशीर न करता या ठिकांणाबद्दल जाणून घेऊया.
1. शनिवारवाडा
विश्वासघात आणि वेदनांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी तुम्ही काय अपेक्षा करू शकता?; रात्र होताच इथे काही भितीदायक आणि भुताटकीच्या घटना घडल्या! आणि शनिवारवाडा किल्ला सर्व भितीदायक ठिकाणांच्या शीर्षस्थानी येतो.
किल्ल्याची आलिशान इमारत पाहून तुम्हाला अंदाजही येणार नाही की ,या किल्ल्यामध्ये किती रहस्ये दडलेली आहेत. कथनांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, इथे आजही नारायणराव पेशवे या तरुण राजपुत्राचा आवाज ऐकायला येतो, ज्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. येथे रात्र झाली की, काका माला वाचावा..काका मला वाचावा…असा आवाज घुमतो. एवढेच नाही तर लोकांचे असेही म्हणणे आहे की, किल्ल्यावर एकदा भीषण आग लागली होती, त्याचे कारण कधीच कळू शकले नाही. या आगीत प्राण गमावलेल्यांचे आत्मेही या किल्ल्यात फिरत आहेत.
2. Symbiosis -विमान रोड
पुण्याचे हे प्रसिद्ध विद्यापीठ पैकी एक असलेल्या या रस्त्यावरही काही विचित्र घटना घडल्या आहेत, अनेकदा सायंकाळच्या सुमारास येथील रिकाम्या व निर्जन ठिकाणी कुत्रे विनाकारण भुंकायला लागतात. येथील लोक नवीन रहिवाशांना आणि विद्यार्थ्यांना मध्यरात्रीनंतर, विशेषत: पौर्णिमेच्या दिवशी या रस्त्यावरून जाणे टाळण्याचा सल्ला देतात कारण या दिवशी आत्मे सर्वात शक्तिशाली असतात.
3. विक्टरी थिएटर
या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये असे काही तरी जिथे तुम्हाला मागील घडलेल्या घटना आठवतात. तुम्ही अजूनही सिनेमा-हॉलचे चाहते असाल, तर पुण्याचे विक्टरी थिएटर तुम्हाला भयानक अनुभव देत, हे ठिकाण पुण्यातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक आहे. दिवसा सर्वकाही सामान्य असलेल्या या विक्टरी थिएटरमध्ये रात्री तेवढेच भयानक अनुभव मिळाले आहेत.
4. चॉईस हॉस्टेल
पुण्यातील कर्वे रोडवरील चॉईस हॉस्टेल बॉईज हॉस्टेल हे असेच एक ठिकाण आहे जिथे प्रत्येक मुलाची वाईट स्वप्ने सत्यात उतरतात. येथे दररोज संध्याकाळी भयंकर घटना घडत असल्या तरी शनिवारची संध्याकाळ सर्वात भयावह असते.
येथे राहणाऱ्या अनेक मुलांनी सांगितले की, लाल साडी घातलेली एक महिला रात्रीच्या वेळी कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसते. आणि अर्थातच, तिच्या हातात एक मेणबत्ती देखील आहे. हे एखाद्या जुन्या हिंदी चित्रपटातील दृश्य वाटतं, नाही का? लोक असेही म्हणतात, जरी हे भूत धोकादायक नाही. ती उदास चेहऱ्याने काहीतरी शोधत फिरते. लोक म्हणतात की इथून जवळच एका महिलेची हत्या झाली होती, हे त्या महिलेचे भूत आहे.
5. सिंहगड किल्ला
हा आलिशान किल्ला केवळ प्रेमी युगुलांसाठी एक लव पॉईंट किंवा वीकेंड गेटवे नाही तर त्याहूनही खूप काही आहे. पूर्वीच्या काळातील एक विशेष अवशेष, हा किल्ला आत्मा आणि भूतांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
या किल्ल्यावर मोठी लढाई झाली होती. हा किल्ला अनेक लोकांच्या मृत्यूचा साक्षीदार आहे. आणि यामुळेच येथील लोक हे ठिकाण भुताटकीचे आणि गूढ घटनांचे केंद्र मानतात आणि अनेकांनी येथे विचित्र आवाज ऐकल्याची कबुली दिली आहे.
लोकांवर विश्वास ठेवला तर येथे तलवारी चकमकतात, लोक जोर-जोरात ओरडतात जणू काही येथे युद्ध सुरू आहे. अशातच तुम्हाला ऐतिहासिक वास्तू आणि भुताटकीच्या घटना या दोन्हीची रहस्ये जाणून घेण्याचा शौक असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.
6. द हॉन्टेड हाऊस
जर एखाद्या घरात एका तरुण मुलीची हत्या झाली असेल, तर तुम्ही तिच्या आत्म्याच्या उपस्थितीचा अंदाज लावू शकता. यामुळे हे घर पुण्यातील सर्वात भयानक असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे आणि सूर्यास्तानंतर कोणीही येथे जात नाही.
इकडे तिकडे विखुरलेले फर्निचर, सगळीकडे जाळे, या घरात इतकं काही आहे की ते पाहून तुमचा आत्मा हादरून जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या मुलीच्या हत्येची कहाणी ही भीती दुप्पट करते आणि येथे घडणाऱ्या भुताटकीच्या घटनांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. तिचा आत्मा अजूनही भटकतो असे म्हणतात
7. होळकर पूल
तुम्ही जर लांबच्या प्रवासाला निघाल तर अठराव्या शतकात महादेवराव होळकरांनी बांधलेला हा पूल तुमच्यासाठी सर्वात भीतीदायक ठरू शकतो. पुण्यातील लोक रात्रीच्या वेळी इथून जाण्यास कचरतात आणि कथा ऐकून ते योग्यच आहे असे वाटते.
गेल्या काही वर्षांत येथे अनेक गूढ मृत्यू झाले आहेत. या पुलावरून जिवंत परत आलेल्यांचा दावा आहे की त्यांच्यासोबत येथे काही विचित्र घटना घडल्या आहेत.
कधी भितीदायक चित्रे, कधी मनाला भिडणारे आवाज.
8. खडकी युद्ध स्मशानभूमी
स्मशानभूमी आणि भुताटकीच्या घटनांचा संबंध सरळ आहे आणि पुण्याची खडकी युद्ध स्मशानभूमीही वेगळी नाही. जिथे मेलेले शांतपणे झोपलेले असतात, तिथे त्यांच्या पुन्हा जागृत होण्याच्या कथाही प्रचलित आहेत.
देशासाठी प्राण देणाऱ्या अशा सैनिकांना येथे दफन करण्यात आले आहे. दिवसा ही स्मशानभूमी जितकी धोकादायक वाटते तितकीच रात्री ती भयानक बनते. रात्री येथे सैनिकांच्या किंचाळण्याचे भयंकर आवाज ऐकू आल्याचा दावा लोकांनी केला आहे.
9. चंदन नगर
सिनेमांमधली भुताची भीती आणि बाहुल्यांचं सौंदर्य एकत्र येऊन तुम्हाला घाबरवलं, अशाच एक प्रकार पुण्यातील चंदन नगरमधला आहे. येथे राहणाऱ्या लोकांनी दावा केला आहे की, त्यांनी अनेकवेळा पांढऱ्या फ्रॉकमध्ये हातात बाहुली असलेल्या मुलीचा आत्मा पाहिला आहे. या भीतीपोटी अनेकदा लोक रात्री बारा वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करतात. बरेच लोक असेही म्हणतात की जर तुम्ही त्या मुलीच्या जवळून गेलात तर ती तुमच्या जवळ येते आणि जोरात ओरडते. पण ही मुलगी भूत बनण्याचे कारण काय? तर मुलगी एका बांधकामाच्या जागेवरून पडून मरण पावली असे म्हटले जाते आणि तेव्हापासून तिचा आत्मा सतावत आहे.
10. द मॅन्शन
एका लोकप्रिय रस्त्यावरचा एक बंगला जो वर्षानुवर्षे बंद पडून आहे. हे ठिकाण आत्म्यांचा आवडता अड्डा असेल याचा अंदाज लावण्यास तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. रेसिडेन्सी रोडवरील हा बंगलाही असाच आहे. लोकांचा विश्वास आहे की येथे एक वृद्ध महिलेचा आत्मा येथे भटकत आहे. मध्यरात्रीनंतर येथे ओरडण्याचे आणि मोठ्याने हसण्याचे भयानक आवाज ऐकू येतात. झाडांच्या मागे लपलेला हा बंगला हुबेहुब हॉरर चित्रपटांसारखा आहे.