Pune Wheat Market Rate : गहू हे राज्यासहित देशातील अनेक राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये गव्हाची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. दरम्यान यंदा बाजारपेठांमध्ये गव्हाला चांगला भाव मिळत आहे.
गव्हाला समाधानकारक दर मिळत असल्याने गहू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रात गव्हाची चांगली आवकही पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये 20 हजार क्विंटलपेक्षा जास्तीच्या गव्हाची आवक झाली. विशेष म्हणजे आज शरबती गव्हाला पुणे बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाचा अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 416 क्विंटल शरबती गव्हाची आवक झाले असून या गव्हाला बाजारात किमान चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल, कमाल पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.
दरम्यान, आज आपण राज्यातील इतर काही प्रमुख बाजारांमध्ये शरबती गव्हाला काय भाव मिळाला आहे ? हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळाला?
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात गव्हाला किमान 2200, कमाल 2500 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये गव्हाला किमान दोन हजार, कमाल २ हजार ९१० आणि सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये शरबती गव्हाला किमान 3100, कमाल 3500 आणि सरासरी 3400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये शरबती गव्हाला किमान 2580, कमाल 3845 आणि सरासरी 3 हजार 65 असा भाव मिळाला आहे.
ठाणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये शरबती गव्हाला किमान 2600, कमाल तीन हजार रुपये आणि सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.