Pune Weather Update : पुण्यासह राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नाहीतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील किमान तापमान थोडेसे वाढलेले आहे. याचा परिणाम हा थंडीवर जाणवू लागला आहे.

आता पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत थंडीचा जोर कमी झाला असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर कमी झाला असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे आता काहीसे कमी झाले आहेत.

दुसरीकडे देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमधून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यातील हवामानातं बदल होणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.

हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची तर काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत आता आपण आगामी पाच दिवस पुण्यातील हवामान कसे राहणार याबाबत हवामान खात्याने दिलेली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार पुण्यातील हवामान ?

आयएमडी कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुढील 2 दिवस आकाश अंशतः निरभ्र राहणार आहे. म्हणजेच पुढील दोन दिवस पुण्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र दोन दिवसानंतर पुण्यातील हवामानात चेंज येणार आहे.

१ जानेवारीनंतर दुपारी व सायंकाळी आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुणे परिसरातील कमाल तापमानात घट होणार आहे आणि किमान तापमानात २ डिग्री सेल्सिअने वाढ होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

तर दुसरीकडे राज्यातील उत्तर महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *