Pune Viral News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. संत्र्यांचे शहर आणि हिवाळी अधिवेशनाचे केंद्र नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मात्र जे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते ते आपल सुंदर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून चिरपरिचित आहे.

सांस्कृतिक राजधानी आपल्या संस्कृती बरोबरच शिक्षण क्षेत्रातील वाखाण्याजोगी कामगिरीमुळे देखील ओळखले जाते. शहरात विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले आहे. येथे स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणारे लाखो उमेदवार देखील दाखल होत असतात.

हेच कारण आहे की या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. अलीकडे तर पुण्यात विविध आयटी कंपन्यांनी सुद्धा इंट्री घेतलेली आहे. यामुळे हैदराबाद, बंगलोर यांसारख्या आयटी हब सोबत आपल्या पुण्याचे तुलना होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे या शहरांना देखील पुण्याने आयटी क्षेत्रात धोबीपछाड दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे पुणे शहर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे. शहरात अशी अनेक ठिकाण आहेत जी एक्सप्लोर केली जाऊ शकतात.

यामुळे पुणे शहराची सुंदरता दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. पुणेरी पाट्या, पुणेरी भाषा, पुण्याची खाद्य संस्कृती, पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे याबाबतचे अनेक व्हिडिओ instagram, facebook, youtube यांसारख्या माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतात.

पुणेकरांना हे व्हिडिओ विशेष आवडतात. जे पुण्याला एकदाच फिरायला गेले आहेत त्यांना देखील पुणे शहराची सुंदरता भुरळ घालते. जो कोणी कामानिमित्त शहरात जातो तो कट्टर पुणेकर बनून जातो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये पुण्यातील असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पुणे शहराची सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ड्रोनच्या माध्यमातून या व्हिडिओची शूटिंग झाली असून उंच आकाशातून आपले सुंदर ते पुणे शहर कसे दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत आकाशातून आपले पुणे शहर कसे दिसते हे पाहता येणार आहे. या व्हिडिओत शहराची सुंदरता पाण्यासारखी आहे.

शनिवार वाडा देखील या व्हिडिओत दाखवण्यात आला आहे. तुम्ही शनिवार वाड्याला कित्येकदा भेट दिलेली असेल मात्र आकाशातून आपला सुंदर शनिवार वाडा कसा दिसतो हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच बघावा लागणार आहे. हा व्हिडीओ लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना प्रेमात पडण्यासारखंच आहे पुणे असं सुंदर कॅप्शन देण्यात आल आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते देखील खूपच खास आहे. तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा-पुन्हा या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये पुणे शहराचे आकाशातून झालेले हे चित्रीकरण प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत.

@iloovepune या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून याला अनेकांनी लाईक केले आहे. मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर देखील केला जात आहे. हा व्हिडिओ खूपच प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *