Pune Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची लोकप्रियता देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या ट्रेनचा आरामदायी आणि जलद प्रवास प्रवाशांना विशेष आकर्षित करत आहे.

प्रवाशांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रवासी संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत देशातील एकूण 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यात देशातील आणखी काही मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या पुण्यावरून एकही थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीये.

मुंबई ते सोलापूर ही गाडी मात्र पुण्या मार्गे धावत आहे. आता मात्र पुणे रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पुण्याला नवीन चार वंदे भारत ट्रेन मिळणार असा मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे.

कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या वर्षभरात पुणे ते बेळगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बडोदा या मार्गावर धावत आहे. यापैकी पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर सध्या शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे.

मात्र ही एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

निश्चितच या चार मार्गांवर जर ही गाडी सुरू झाली तर पुणेकरांना देशातील विविध शहरांमध्ये प्रवास करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक सोयीचा आणि जलद होणार आहे.

मुंबईलाही मिळणार तीन वंदे भारत ट्रेन

फक्त पुण्यालाच नाही तर राजधानी मुंबईला देखील नवीन तीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोल्हापूर, मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शेगाव दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकतात.

सध्या स्थितीला राजधानी मुंबई वरून पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. जर येत्या वर्षाभरात या तीन गाड्या सुरू झाल्यात तर ही संख्या आठ वर पोहोचणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *