Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील भारतीय बनावटीची पहिली हाई स्पीड ट्रेन आहे. आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही नवीन मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सांस्कृतिक राजधानी पुण्याला काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा आणि पुणे ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
अशातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पुणे ते बेळगाव या मार्गावर सुद्धा ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
अर्थातच भविष्यात पुण्याला चार नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. सध्या स्थितीला पुण्याहून मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहे.
या ट्रेनमुळे पुणेकरांचा सोलापूर आणि मुंबईकडील प्रवास जलद झाला आहे. तथापि, पुणे येथील रेल्वे स्थानकावरून अजूनही थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. आता मात्र लवकरच 4 नवीन वंदे भारत एक्सप्रेस थेट पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहेत.
महाराष्ट्रातुन किती Vande Bharat Train सुरु आहेत?
देशातील एकूण 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यापैकी सात मार्ग आपळ्या महाराष्ट्रातून जातात. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
या हायस्पीड ट्रेनमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित झाला आहे. या मार्गावर सुरू असलेल्या या हाय स्पीड ट्रेनला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे.