Pune Traffic News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातील काही भागांमध्ये वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 11 एप्रिल 2024 रोजी मुस्लिम बांधवांच्या रमझान ईद या सणाच्या निमित्ताने शहरातील वाहतुकीत बदल झालेला आहे.
या सणानिमित्त शहरातील गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि यामुळे साहजिकच या भागात वाहतूक सुरू राहिली तर वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.
हेच कारण आहे की या परिसरातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. या परिसरात आज सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता हा गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पटनासाठी उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या रस्त्यांवरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. दरम्यान, या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोण-कोणते रस्ते बंद राहतील आणि पर्यायी मार्ग कोणते?
1)रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आज गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता आज नवमाज पठण होईपर्यंत या भागातील प्रवाशांना गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
2) रमजान ईद मुळे आज गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या भागातील प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. लुल्लानगरकडून खाण्या मारुती चौकाकडे जाणाऱ्यां प्रवाशांना खटाव बंगला चौक- नेपियर रस्ता- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक- भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाता येणार अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
3) गोळीबार येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून येथील प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. यानुसार सॅलिसबरी पार्क – सी.डी.ओ. चौक – भैरोबानाला येथून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळे जाता येणार आहे.
4) ईदगाह मैदानावर नमाज पठनसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाण्यास बंदी राहणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वळून पुढे किंवा नेपियर रस्त्याने इच्छित स्थळी जाता येणार आहे.
5)याशिवाय, आज अर्थातच 11 एप्रिलला भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळवली गेली आहे. यानुसार आज भैरोबानाला ते एम्प्रेसगार्डन मार्गे किंवा लुल्लानगरमार्गे प्रवाशांना पुढील प्रवास करता येणार आहे.
6) आजच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड,अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी आणि पीएमपी बसेस यांना वाहतुकीसाठी बंदी राहणार आहे. आज येथील प्रवाशांना लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी प्रवास करता येणार आहे.