Pune Tourist Spot : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला ओळखल जात. खरे तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे शहर आणि जिल्हा राज्याच्या संस्कृतीचे सुंदरतेचे दर्शन घडवते. हेच कारण आहे की, पुण्याला कल्चरल कॅपिटल म्हणून गौरवण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण असा हा जिल्हा एक्सप्लोर करण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येथे हजेरी लावत असतात.
मात्र आज आपण पुण्यातील अशा एका फेमस टुरिस्ट स्पॉट बाबत जाणून घेणार आहोत जिथे भेट दिल्यानंतर तुम्हाला स्वर्गासारखा अनुभव घेता येणार आहे.
जर तुम्हाला धबधबे पाहणे आवडत असेल तर तुम्ही पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट हा उलटा धबधबा नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे. जर तुम्ही पुण्यात फिरण्यासाठी गेला तर जुन्नर तालुक्यातील या धबधब्याला एकदा अवश्य भेट द्या.
वास्तविक, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि डोंगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. तर फक्त धबधब्याचे नाही तर संपूर्ण सह्याद्रीच पर्यटकांना आकर्षित करते.
सह्याद्रीचे दर्शन व्हावे यासाठी जगभरातून पर्यटक सह्याद्रीच्या कुशीत बारा महिने गर्दी करत असतात. मात्र जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे असणारा उलटा धबधबा हा पर्यटकांसाठी विशेष आश्चर्याचा विषय आहे.
सह्याद्रीचा हा चमत्कार पाहण्यासाठी येथे हजारो पर्यटक रोजाना भेटी देतात. धबधबा हा उलटा वाहतो यामुळे ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी येथे नेहमीच गर्दी राहते.
मात्र पावसाळ्यात गर्दीचे प्रमाण अधिक असते. नाणेघाट येथील उलटा धबधबा हा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतो.
खरे तर नाणेघाटातील धबधब्याचे पाणी हे खालीच पडते परंतु हवेचा मोठा दाब असल्यामुळे ते पाणी पुन्हा वर येते. नाणेघाट हा पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर आहे.
जर तुम्ही पुण्यापासून जवळ असणारे एखादे फेमस टुरिस्ट शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या धबधब्याचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.