Pune Tourist Spot : आपल्यापैकी अनेकजण रोजच्या रुटीन कामांमधून वेळ काढून वीकेंडला फिरण्याचा प्लॅन बनवतात. यापैकी अनेक जण पुण्यात ट्रिप काढतात. खरे तर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.
याशिवाय या शहराला विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. सोबतच पुणे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. पुण्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
शहरातील पर्यटन स्थळांवर नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पुण्यातील तसेच मुंबईमधील हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात.
याशिवाय राज्यातील इतरही शहरांमधून आणि देशातील इतरही अन्य ठिकाणातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पुणे शहरात पर्यटनासाठी दाखल होत असतात.
जर तुम्ही ही पुण्यात ट्रिप काढणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण पुण्यातील टॉप तीन फेमस टुरिस्ट डेस्टिनेशनची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शनिवार वाडा : या वाड्याची निर्मिती पेशवे काळात झाली आहे. पेशव्यांच्या काळात शनिवार वाडा बांधून तयार झाला. मात्र पुढे इंग्रजांचे भारतावर राज्य आले. तेव्हा इंग्रजांनी भारतातील अनेक ऐतिहासिक वास्तू पाडल्यात. शनिवार वाडा देखील इंग्रजांच्या काळात पाडला गेला.
मात्र आजही शनिवार वाड्याचा पाया इथे तुम्हाला पाहायला मिळतो. जर तुम्ही पुणे एक्सप्लोर करण्यासाठी जाणार असाल तर शनिवार वाड्याला देखील भेट दिली पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे.
आगा खान पॅलेस : पुण्यातील आणखी एक फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजेच आगाखान पॅलेस. येथे दररोज हजारो पर्यटक भेटी देत असतात. जर तुम्ही ही पुण्याला गेलात तर येथे नक्कीच भेट द्या. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांना या ठिकाणी इंग्रज सरकारने कोंडले होते.
यामुळे या वास्तूला मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे भारताच्या स्वातंत्र्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या अनेक नेत्यांचा वास होता.
ओशो आश्रम : हे आश्रम १९७४ मध्ये बांधले गेले आहे. हे आश्रम एखाद्या रिसॉर्ट सारखे भासते. 28 एकरांवरील हे आश्रम पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही पुण्याला फिरायला गेलात तर नक्कीच या आश्रमाला एकदा भेट दिली पाहिजे. येथे तुम्हाला पाहण्यासारख्या अनेक गोष्टी मिळतील. जर तुम्ही पुण्यात ट्रिप काढली तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या यामुळे तुमची ट्रिप आणखी खास होणार आहे.