Pune Tourist Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर तुम्हीही या उन्हाळी सुट्टीत पिकनिकसाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण पुण्याजवळील काही बेस्ट पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. या पिकनिक स्पॉटवर पावसाळा असो किंवा उन्हाळा नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
जर तुम्हीही नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून रिलॅक्स होण्यासाठी बाहेर फिरायला जाणार असाल तर पुण्याजवळील हे टुरिस्ट डेस्टिनेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी वनडे ट्रिपचे सुद्धा नियोजन करू शकता.
पुण्याजवळील बेस्ट पिकनिक स्पॉट
माळशेज घाट : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिल स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्हीही उन्हाळ्यात हिल स्टेशनवर जाण्याचा प्लॅनमध्ये असाल तर माळशेज घाट हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. पावसाळ्यात माळशेज घाटचे सौंदर्य आणखी फुलते.
यामुळे पावसाळ्यात येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते. तथापि असे अनेक पर्यटक आहेत जे की उन्हाळ्यात देखील माळशेज घाटात फिरायला निघतात.येथील सौंदर्य नजरेत कैद करण्यासाठी उन्हाळ्यात देखील पर्यटकांची या ठिकाणी वर्दळ पाहायला मिळते.
पुण्यापासून तीन तासाच्या अंतरावर वसलेले हे ठिकाण तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे. माळशेज घाटात माळशेज धबधबा, आजोबागड किल्ला, पिंपळगाव जोगा धरण आणि कोकणकडा यासारखी उत्तम ठिकाणे तुम्हाला पाहता येतील.
पवना तलाव : पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण वसले आहे. पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
पवना तलावाचे सौंदर्य शब्दात वर्णनासारखे नाहीये. जर तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपच्या आयोजन करत असाल तर पवना तलाव हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.
कामशेत : पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कामशेतला मोठी गर्दी पाहायला होते. हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असून एक फेवरेट समर डेस्टिनेशन आहे. येथील शांत परिसर, हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडणार आहे.
या ठिकाणी ट्रेकिंग साठी आणि पॅराग्लाइडिंग साठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे जर तुम्हाला ही ट्रेकिंग किंवा पॅराग्लाइडिंग करायची असेल तर तुम्ही येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. कामशेत हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या 48 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. येथे तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपचे नियोजन करू शकता.