Pune Tourist Spot : पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. कडाक्याच्या थंडीत पर्यटनाचा आनंद घेतात. पावसाळ्यात रिमझिम सऱ्यामध्ये जशी फिरण्याची मजा असते तशीच मजा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीतही येते.

दरम्यान, जर हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत तुम्हीही कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.

कारण की आज आपण अशा एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात.

आजचे हे पर्यटन स्थळ पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले आहे. यामुळे पुण्यातील नागरिकांना जर या गुलाबी थंडीत कुठे फिरायचे असेल तर हे ठिकाण त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

खरे तर फिरण्यासाठी अनेकजण हिल स्टेशन, पर्वत टेकड्या, म्युझियम, ऐतिहासिक वारसा स्थळे, ऐतिहासिक वास्तूंना भेट देत असतात. तर काही लोकांना किल्ल्यांवर फिरायला आवडते.

दुर्गप्रेमी किल्ल्यांना भेट देऊन ट्रेकिंगचा आनंद घेतात. जर तुम्हीही पुण्याजवळील एखाद्या किल्ल्याला भेट देण्याच्या विचारात असाल तर तुम्ही पुण्याजवळील जीवधन किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजे.

खरे तर पुणे जिल्ह्याला भरपूर प्रमाणावर निसर्ग सौंदर्य लाभलेले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणे फिरण्यासारखे आहेत. अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे पुणे जिल्ह्यात वसलेले आहेत.

जीवधन किल्ला हे देखील असेच एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी येत असतात. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांनी एकदा तरी जीवधन किल्ल्याला नक्कीच भेट दिलेली असेल.

असं सांगितलं जातं की हा किल्ला नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आला होता. या किल्ल्यावरुन नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड या ठिकाणाची दृश्य पाहायला मिळतात.

या किल्ल्याला लाभलेले मनमोहक सौंदर्य तुमच्या मनाला निश्चितच प्रसन्नता देणार आहे. नाणेघाटापासून हा किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे जर तुम्ही या वीकेंडला ट्रेकिंग साठी निघणार असाल तर हा किल्ला तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *