Pune To Goa Flight : पुणे ते गोवा हा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. खरंतर पुण्याहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याशिवाय गोवा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच अधिक आहे. अनेक लोक या दोन शहरादरम्यानचा प्रवास विमानाने करतात.
दरम्यान या दोन शहरातील प्रवास विमानाने करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार आहे.
यामुळे आता पुणेकरांना गोव्याचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकासा एअरलाइन्सने पुणे ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू केली आहे.
यामुळे आता फक्त 60 मिनिटात पुणे ते गोवा हा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच, नवीन वर्षात गोवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही बातमी खूपच आनंदाची राहणार आहे. सध्या गोव्यातील पर्यटन हंगाम सुरू आहे.
यामुळे मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांमधून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषता पुण्यामधून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे.
खरंतर पुण्याचे सध्याचे विमानतळ हे नवीन विमान सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या एअरलाइन्स कंपन्यांसाठी अपुरे पडत आहे. यामुळे पुणे शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष बाब अशी की पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल चे काम पूर्ण झाले आहे मात्र उद्घाटनाअभावी हे टर्मिनल सर्वसामान्यांसाठी सुरू होत नाहीये.
यामुळे आता विमान प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता आपण पुणे ते गोवा दरम्यानच्या अकासा एअरलाइन्स कंपनीच्या विमानसेवेचे वेळापत्रक कसे राहणार याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, आकासा एअरलाइन्स कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी 5.35 वाजता उड्डाण घेणार आहे आणि सायंकाळी 6.35 वाजता ही फ्लाईट गोव्यात दाखल होणार आहे.
तसेच गोव्यातून हे विमान दुपारी 3.45 वाजता उड्डाण भरणार आहे आणि दुपारी 4.45 वाजता पुण्यात लँड होणार आहे. अर्थातच हा प्रवास फक्त 60 मिनिटात पूर्ण होणार आहे.