Pune Sangli Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच गाड्या हाउसफुल धावत आहेत. रेल्वे प्रमाणेच ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बस मध्ये देखील मोठी गर्दी होत आहे.
उन्हाळी सुट्टी लागली असल्याने प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. दरम्यान हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने सांगली आणि पुणेकरांना मोठी भेट दिली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होत असलेली अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईच्या सीझनमध्ये रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हुबळी ते अहमदाबाद यादरम्यान विशेष उन्हाळी एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे नेमके वेळापत्रक कसे आहे ? हे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे वेळापत्रक ?
उन्हाळ्यातील सुट्यांसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हुबळी-अहमदाबाद उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही ट्रेन सांगली, पुणे मार्गे धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हुबळी-अहमदाबाद (गाडी क्र. ०७३११) ही विषेश रेल्वे गाडी २८ एप्रिल ते २६ मे या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही ट्रेन प्रत्येक रविवारी रात्री हुबळी येथून सुटणार आहे आणि सांगली, पुणे मार्गे अहमदाबादला जाणार आहे. तसेच अहमदाबाद-हुबळी (गाडी क्र. ०७३१२) ही विशेष एक्स्प्रेस ट्रेन २९ एप्रिल ते २७ मे या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी प्रत्येक सोमवारी अहमदाबाद येथून सुटून पुणे, सांगलीमार्गे हुबळीला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.