Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
दरम्यान हीच अडचण सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा रस्ते प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी दूर होईल अशी आशा महामंडळाने व्यक्त केली आहे.
सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून या प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरेतर, या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेसाठी महामंडळाने दोनदा मुदत वाढ देखील दिली होती.
यानुसार आता या निविदा सादर करण्याची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत या प्रकल्पासाठी 19 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. यातील चार कंपन्या या फॉरेनच्या आहेत. म्हणजेच पुणे रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परदेशी कंपन्यांना देखील भुरळ पडली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पुणे रिंग रोडला राज्य शासनाने विशेष राज्य मार्गाचा दर्जा दिलेला आहे. हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याचे काम जलद गतीने व्हावे अशी इच्छा महामंडळाची आहे.
या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी या प्रकल्पाचे काम विविध पॅकेज मध्ये विभागले गेले आहे.
या प्रकल्पाचे काम एकूण दोन भागात केले जाणार आहे. पुणे रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड असे दोन भाग करण्यात आले आहेत. यातील पश्चिम रिंग रोडचे काम एकूण पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व रिंग रोडचे काम एकूण चार पॅकेज मध्ये पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या विविध पॅकेजचे काम एकाच वेळी सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यामुळे याचे काम सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पासाठी आधी ठेकेदारांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर निघाले होते. दरम्यान आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
यानुसार आत्तापर्यंत 19 कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या आहेत. यामध्ये सिंगापूर आणि अमेरिका यासह चार परदेशी कंपन्यांनी निविदा दाखल केलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता कालावधीमध्ये या दाखल झालेल्या निविदा उघडल्या जातील. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश आचारसंहिता संपल्यानंतरच दिले जाणार आहेत.
एकंदरीत आचारसंहिता संपल्यानंतर पुणे रिंग रोडचे काम सुरू होऊ शकणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रकल्पाच्या कामाची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्याचे काम लवकरच सुरू होणार असे चित्र तयार होत आहे.