Pune Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहराचा देखील मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधावर मात्र मोठा ताण येऊ लागला आहे.
प्रामुख्याने रस्ते अन रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा ताण पाहायला मिळत आहे. परिणामी रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. सोबतच रस्त्यांचे देखील नेटवर्क तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
रस्त्यांचे नेटवर्क सुधारण्यासाठी आणि शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील हाती घेण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी तर फोडणारच आहे शिवाय हा प्रकल्प शहराच्या विकासाला हातभार लावणार असा दावा केला जात आहे.
दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरे तर 172 किलोमीटर लांबीचा या रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात केले जात आहे. यापैकी पश्चिम भागातील भूसंपादन याआधीच पूर्ण झाले आहे.
तर पूर्व भागातील भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. खरे तर पूर्व भागातील रिंग रोडसाठी 48 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. मावळ 11, खेड 12, हवेली 15, पुरंदर सात आणि भोर तीन अशा एकूण 48 गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे.
दरम्यान भूसंपादनासाठी खेड तालुक्यातील बारा गावांमधील जमिनीचे दर यापूर्वीच निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे येत्या बुधवारी मावळ तालुक्यातील 11 आणि हवेली तालुक्यातील 15 अशा एकूण 26 गावांमध्ये भूसंपादनासाठी जमिनीचे दर अंतिम केले जाणार आहेत.
27 डिसेंबर 2023 रोजी या दोन्ही तालुक्यांमध्ये जमिनीचे दर निश्चित केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत या गावांचे जमिनीचे दर निश्चित केले जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मिळाली रिपोर्ट मधून समोर आली आहे.
खरे तर रिंग रोड साठी पूर्व भागातील 48 आणि पश्चिम भागातील 34 गावांमधील जवळपास 1740 हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. यापैकी पश्चिम भागातील 716 हेक्टर जमीन संपादित झाली आहे आणि आता पूर्व भागातील 885 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 27 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यापैकी 12000 कोटी रुपये फक्त भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. तर उर्वरित पंधरा हजार कोटी रुपयांचे बांधकाम केले जाणार आहे.
आतापर्यंत पश्चिम भागातील सहाशे हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित जमिनीचे संपादन देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. तर आता दुसरीकडे पूर्व भागातील जमिनीच्या संपादनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
या अनुषंगाने आतापर्यंत खेड तालुक्यातील बारा गावांच्या जमिनीचे दर निश्चित झाले असून आता हवेली आणि मावळ या दोन तालुक्यांमधील जमिनीचे दर निश्चित केले जाणार आहेत.